घरCORONA UPDATECorona Cases : राहुल गांधींचा अंदाज खरा ठरला; ट्वीटची आठवण करून देत...

Corona Cases : राहुल गांधींचा अंदाज खरा ठरला; ट्वीटची आठवण करून देत साधला निशाणा!

Subscribe

देशात कोरोनाचा कहर सुरूच असून अजूनही कोरोनाची लस इतक्यात येण्याची कोणतीही चिन्ह नाहीत. देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांच्या वर गेलेली असताना मृतांचा आकडा देखील ४१ हजारांच्या वर गेला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी १७ जुलै रोजी केलेल्या आपल्या ट्वीटला रीट्वीट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘२० लाखांचा आकडा पार, गायब आहे मोदी सरकार’, अशा आशयाचं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे. त्यामुळे देशातल्या कोरोनाच्या संकटामध्ये केंद्र सरकार कोणत्याही प्रकारे उपाययोजनांमध्ये पुढाकार घेत नसून सर्वकाही राज्य सरकारांवर सोपवण्यात आलं आहे अशा प्रकारची टीका आता काँग्रेसकडून केली जाऊ लागली आहे. त्यामध्ये राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सातत्याने मोदी सरकारवर प्रखर टीका केली आहे.

सर्वात पहिल्यांदा १४ जुलै रोजी राहुल गांधींनी ट्वीट केलं होतं की ‘आठवड्याभरात देशात १० लाख कोरोनाग्रस्त असतील’. १७ जुलैलाच देशातली रुग्णसंख्या (Corona Cases in India) १० लाखांवर गेली होती.

- Advertisement -

१७ जुलैला राहुल गांधींनी ट्वीट केलं होतं ‘१० लाखाचा आकडा पार झाला. याच वेगाने कोरोना देशात पसरला, तर १० ऑगस्टपर्यंत देशात २० लाखांपेक्षा जास्त रुग्ण असतील. सरकारला या महामारीला थांबवण्यासाठी ठोस आणि नियोजित पावलं उचलावी लागतील.’

- Advertisement -

राहुल गाधींचं हेच ट्वीट खरं ठरलं असून १० ऑगस्टच्या आतच देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांच्या वर गेली आहे. त्यालाच अनुसरून आता राहुल गांधींनी तिसरं ट्वीट केलं असून त्यामध्ये ‘२० लाखांचा आकडा पार, गायब आहे मोदी सरकार’, अशी टीका केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांमध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे ६२ हजार ५३८ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २० लाख २७ हजार ०७४ इतकी झाली आहे. त्यासोबतच गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ८८६ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा ४१ हजार ५८५ इतका धाला आहे. आजघडीला देशात ६ लाख ०७ हजार ३८४ अॅक्टिव्ह कोरोना पेशंट आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -