घरदेश-विदेशHathras Gang Rape : पीडितेच्या कुटुंबियांना भेटणारच; राहुल - प्रियांकाचा पायी प्रवास...

Hathras Gang Rape : पीडितेच्या कुटुंबियांना भेटणारच; राहुल – प्रियांकाचा पायी प्रवास सुरू

Subscribe

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार आणि त्यानंतर तिचा मृत्यू या घटनेमुळे संपूर्ण देश हादरले आहे. तिला ज्ञाय मिळावा यासाठी समाजातील प्रत्येक स्तरातून आवाज उठवला जात आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक झाली असून पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी हे उत्तर प्रदेशमध्ये पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी दिल्लीहून निघाले आहेत. राहुल आणि प्रियांकाने हाथरसला जाण्याचे निश्चित करताच उत्तर प्रदेशातील सरकारने राज्यातील पोसील फौजफाटा तैनात केला आहे. दुपारी १२ च्या आसपास दोघेही दिल्लीहून हाथरसला रवाना झाले. मात्र त्याआधीच जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आला आहे. तसेच योगी सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. येथे संपूर्ण महिना म्हणजेच ३१ ऑक्टोबरपर्यंत १४४ कलम लागू असल्याचे त्यांनी नमूद केले असून राज्यातील सर्व सीमा सील केल्या आहेत. तरीही हाथरसला निघालेल्या राहुल आणि प्रियांका यांना दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर अडवण्यात आले असल्याने ते पायीच हाथरसला निघाले आहे.

- Advertisement -

यासाठी अडवला मार्ग 

राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस-वेवर राहुल आणि प्रियंका गांधी यांना अडवेल. यावेळी फक्त दोघांनाच पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली होती आणि कार्यकर्ते व इतर नेत्यांना रोखण्यात आले. पुढे गेल्यानंतर जेव्हा पुन्हा पोलिसांनी रोखले तेव्हा मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

काय आहे संपूर्ण प्रकरण 

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी एका १९ वर्षीय मुलीवर शेतात सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. जखमी मुलीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारदरम्यान मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला. मुलीला बलात्कारानंतर बेदम मारहाण करण्यात आली होती, इतकेच नव्हे तर तिची जीभ कापून पाठीचे हाड मोडले होते. हाथरसच्या चंदपा भागात आईसह चारा आणण्यासाठी गेलेल्या तरुणीवर गावातीलच ४ नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवतीच्या किंचाळ्यामुळे नराधम पळून गेले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर जखमी मुलीला अलीगडच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले होते. मात्र, तिची तब्येत अधिक बिघडल्याने तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले होते. अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर आज तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पोलिसांनी ८ दिवसांनंतर सामूहिक बलात्काराचे कलम एफआयआरमध्ये समाविष्ट केले होते.

हेही वाचा –

होय, बाबरीचा विध्वंस पूर्वनियोजितच, माझ्याकडे पुरावे होते – न्या. लिब्रहान!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -