घरताज्या घडामोडीफेब्रिकेशनचा धंदा चांगला चालल्याने माजला आहे का म्हणत एकास बिअर बॉटलने मारहाण

फेब्रिकेशनचा धंदा चांगला चालल्याने माजला आहे का म्हणत एकास बिअर बॉटलने मारहाण

Subscribe

फेब्रिकेशनचा धंदा चांगला चालल्याने खूप माजला आहे का म्हणत एकाने बिअर बॉटलने बेदम मारहाण केल्याची घटना गोसावीवाडी दत्तमंदिराजवळ, नाशिकरोड येथे घडली. याप्रकरणी आकाश चंद्रकांत नेवडे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी करण (पूर्ण नाव समजू शकले नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व संशयित करण एकमेकांच्या ओळखीचे आअहेत. तुझा फेब्रिकेशनचा धंदा चांगला चालला आहे. त्यामुळे तू खूप माजला आहे, असे म्हणत संशयित करण याने बिअरची बॉटल तक्रारदाराच्या डोक्यात मारुन फोडली. त्यानंतर फुटलेल्या बॉटले पुन्हा तक्रारदारावर हल्ला केला. त्यात तक्रारदार जखमी झाला. पुढील तपास पोलीस हवालदार भालेराव करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -