घरताज्या घडामोडीरोज मुलं मरतात, त्यात नवीन काय? - राजस्थानचे मुख्यमंत्री

रोज मुलं मरतात, त्यात नवीन काय? – राजस्थानचे मुख्यमंत्री

Subscribe

देशात बालमृत्यूचं वाढतं प्रमाण ही एक मोठी समस्या असून त्यावर अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर काम करण्याची गरज असताना राजस्थान सरकार मात्र या मुद्द्यावर अजूनही गंभीर नसल्याचंच दिसून येत आहे. राजस्थानमध्ये गेल्या वर्षभरात ९०० बालमृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. असं असलं, तरी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांसाठी मात्र ही फारशी गंभीर बाब असल्याचं दिसत नाही. ‘देशात प्रत्येक रुग्णालयात रोज ३ ते ४ मृत्यू होतच असतात. त्यात काही नवीन गोष्ट नाही’, असं वादग्रस्त वक्तव्य राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलं आहे. त्यामुळे या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

बालमृत्यूचा आकडा ९००वर

नुकतेच राजस्थानच्या कोटा परिसरामध्ये १० नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यावर प्रसारमाध्यमांनी अशोक गेहलोत यांना विचारणा केली असता त्यांनी वरील उत्तर दिलं. ‘गेल्या ६ वर्षांमध्ये सर्वात कमी बालमृत्यू या वर्षी झाले आहेत. एका बालकाचा मृत्यू देखील दुर्दैवी आहे. पण याआधी अनेकदा कधी १५०० तर कधी १३०० बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पण या वर्षी हा आकडा ९०० वर आला आहे’, असं ते म्हणाले. मात्र, त्यानंतर लगेचच त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘देशात सध्या रोज ३ ते ४ बालकांचा मृत्यू होत असतो. त्यात नवीन काही नाही. त्यावर आम्ही तातडीने पावलं उचलत आहोत’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, अशोक गेहलोत यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर नेटिझन्सनी टीकेची झोड उठवली आहे.

- Advertisement -

कोटा हा लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांचा मतदारसंघ असून या मुद्द्यावर त्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. एकट्या कोटामधल्या जे. के. लोन रुग्णालयात महिन्याभरात ७७ बालकांचा मृत्यू झाल्यामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -