घरताज्या घडामोडीएमएसपीवर कायदा करा अन् मृत शेतकऱ्यांना शहिदांचा दर्जा द्या, शेतकरी नेते राकेश...

एमएसपीवर कायदा करा अन् मृत शेतकऱ्यांना शहिदांचा दर्जा द्या, शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मागणी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेले तीन वादग्रस्त कृषी कायदे अखेर मागे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. परंतु शेतकऱ्यांकडून अद्यापही आंदोलन सुरुच ठेवण्यात आले आहे. एमएसपीवर कायदा करण्यात यावा आणि जे शेतकरी आंदोलनात मृत्यू पडले आहेत. असा ७५० शेतकऱ्यांना शहिदांचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे.

शेतकरी मोर्चा संघटनेचे नेते आणि भाकयूचे नेते राकेश टिकैत लखनऊत एका सभेत असताना मागणी केली आहे. राकेश टिकैत म्हणाले की, एमएसपीवर कायदा करण्यात यावा, आंदोलनात ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला त्या शेतकऱ्यांना शहिदांजा दर्जा देण्यात यावा. तसेच भाजप खासदार आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना मंत्रिमंडळातून बर्खास्त करण्यात यावे अशी मागणी राकेश टिकैत यांनी केली आहे. तसेच दुधावरुनही एक योजना येत असून त्यालाही आमचा विरोध आहे. तसेच बियाण्यांवरीलही कायदा आहे अशा सर्वच विषयांवर आम्ही चर्चा करणार असल्याचे राकेश टिकैत यांनी सांगितले.

- Advertisement -

ओवैसी आणि भाजपमध्ये काका-पुतण्याचे नाते

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी एआईएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ओवैसी यांनी सीएए कायदा मागे घेण्याची मागणी केली होती. ओवैसी आणि भाजपमध्ये काका-पुतण्याचं नाते आहे. त्यामुळे त्यांना माध्यमांद्वारे बोलण्याची गरज नव्हती. ते थेट विचारु शकत होते असे राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलक अजूनही प्रतिक्षेत

कृषी कायदे मागे घेण्यात आले आहेत. परंतु शेतकऱ्यांचा अद्याप विश्वास बसला नाही. संसदेत कृषी कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव येई पर्यंत मोर्चा सुरुच राहणार असल्याचे शेतकरी आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून मोर्चा सुरुच ठेवत केंद्र सरकारवर दबाव आणणयाचा प्रयत्न सुरु आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राहुल गांधींना हायकोर्टाचा दिलासा; ‘चौकीदार चोर है’ वक्तव्याप्रकरणी २० डिसेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -