घरदेश-विदेशदेशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकारने आरोप करू नये - रावसाहेब दानवे

देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकारने आरोप करू नये – रावसाहेब दानवे

Subscribe

राज्यातील वीज उत्पादन संकटास केंद्र सरकारकडून कोळसा पुरवठा होत नसल्याचे कारण देऊन करण्यात येत असलेल्या आरोपात अजिबात सत्यता नाही. केंद्र सरकारने राज्य सरकारला पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आवश्यक कोळसा साठवणुकीचे नियोजन करण्याचे कळवले असताना राज्य सरकारने कोळशाची साठवणूक केली नाही आणि आता केंद्र सरकारवर ठपका ठेवत आहेत, ही जनतेची दिशाभूल आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वीज उत्पादन संकटास केंद्र सरकारकडून कोळशाचा पुरवठा होत नसल्याच्या संदर्भातील आरोपासंदर्भात दानवे बोलत होते.

महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्याही कारणासाठी केंद्र सरकारवर आरोप करत सुटलेलेत. मग ते कोरोना असो, अतिवृष्टी असो, शेतकऱ्यांचे नुकसान, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण काही झाले की केंद्र जबाबदार, असे बोलण्याचा त्यांना हा एकमेव छंद लागलेला आहे. देशातील सर्व राज्य सरकारकडून कोळशाची मागणी होते त्यानुसार पुरवठा करण्यात येतो आज आवश्यकतेनुसार भरपूर प्रमाणात कोळसा उपलब्ध असताना त्यांचे म्हणणे आहे की कोळसा नाही.

- Advertisement -

देशात चाळीस लाख मेट्रीक टन कोळसा भांडारात उपलब्ध आहे कोळसा खाण केंद्रावर सात लाख मेट्रीक टन कोळसा अतिरिक्त साठवलेला आहे. भयंकर पाऊस झाल्यानंतर सुध्दा आमच्या अधिकाऱ्यांनी व कामगारांनी रात्रंदिवस अतिशय जोखीम घेऊन सातत्याने मेहनतीने प्रयत्न करत काम करून पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात कोळशाचे उत्पादन केले आहे असे दानवे म्हणाले.

महाराष्ट्र राज्याला, कोल इंडियाने अनेक पत्र लिहून त्यांचा कोळशाचा हिस्सा त्यांनी उचलावा असे वारंवार सांगितले होते. मात्र महाजनकोने त्या पत्राची दखल न घेता कोणत्याही प्रकारचे शेड्युल कोल इंडियाकडे पाठवले नाही. कोळशाचे योग्य नियोजन न केल्यामुळे महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

परदेशातून वीस टक्के कोळसा आपल्या देशात येतो तो महाग झाला आहे मात्र त्यापेक्षा अधिक कोळशाचे उत्पादन आपण केले आहे गतवर्षीच्या तुलनेत आपले उत्पादन वाढले आहे भारतात पर्याप्त कोळसा उपलब्ध आहे चिंता करण्याचे काही कारण नाही राज्य सरकारचे नियोजन फसले त्यांनी पावसाच्या पूर्वी आवश्यक साठा केलेला नाही असे दानवे यांनी सांगितले.

महाराष्ट्र बंद हा राज्य सरकारचा बंद होता, पोलीस लोकांना मारत होते दुकाने पोलिसांनी बंद केली हा जनतेचा बंद नव्हता सरकारचा बंद होता मानव अधिकाराचे उल्लंघन झाले आहे. बलात्काराच्या सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात आहेत राज्य सरकारचे त्याकडे अजिबात लक्ष नाही शेतकऱ्यांना दिलासा नाही ज्याकडे लक्ष द्यायचे तिकडे यांचे लक्ष नाही आणि उत्तर प्रदेश, बिहार, कोलकाताची हे कॉपी करत बसलेत. हे कॉपी सरकार आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -