घरदेश-विदेशसर्वात पहिले विमान उडवणारे होते रावण; श्रीलंकेचा दावा

सर्वात पहिले विमान उडवणारे होते रावण; श्रीलंकेचा दावा

Subscribe

रावणाने तब्बल पाच हजार वर्षांपूर्वी विमान उडवले होते. विमानाचा वापर सर्वात प्रथम रावणानेच केला होता, असा दावा श्रीलंका सरकारकडून करण्यात आला आहे. यादरम्यान श्रीलंका सरकारने रावणासंबंधी जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी लोकांना त्यांच्याकडे कागदपत्रे किंवा पुस्तकाच्या माध्यमातून असणारी कोणत्याही प्रकारची माहिती शेअर करण्यास सांगितले आहे. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, जाहिरात पर्यटन तसेच नागरी उड्डाण मंत्रालयाकडून वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यातून लोकांना पुढे येऊन रावणांसंबंधी त्यांच्याकडे असणारी उपलब्ध माहिती देण्यास सांगितले आहे.

श्रीलंकेच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने विमान उडवण्यासाठी रावणाकडून वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी एक मोहीम हाती घेतली आहे. याबाबत नागरी उड्डयन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष शशी दानतुंज यांनी सांगितले आहे की, रावण अलौकिक बुद्धिमत्ता असलेला राजा होता. विमानाचे उड्डाण करणारी ती पहिली व्यक्ती होती. ही पौराणिक कथा नसून तथ्य आहे. यावर सविस्तर संशोधन होण्याची गरज आहे. पुढील पाच वर्षात आम्ही हे सिद्ध करू.

- Advertisement -

हेही वाचा –

पुण्याचा धोका वाढतोय; २४ तासांत आढळले २,६०१ रुग्ण, ४४ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -