घरदेश-विदेशकेरळच्या तीन जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; रेड अलर्ट जारी

केरळच्या तीन जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; रेड अलर्ट जारी

Subscribe

तामिळनाडू, पाँडीचेरी आणि केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय मच्छिमारांना समुद्रात उतरु नये असा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने केरळच्या तीन जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. पुढच्या तीन दिवसामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्यानुसार ५ ऑक्टोबरला अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने अरबी समुद्र खवळणार आहेत. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचे आदेश हवामान खात्याने दिले आहेत. पुढच्या ४८ तासामध्ये तामिळनाडू, पाँडीचेरी आणि केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

अतिवृष्टीचा इशारा

कर्नाटकच्या दक्षिण भागातील लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांवर ८ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने केरळच्या पूर्व आणि मध्य भागामध्ये असणाऱ्या इंदुक्की, त्रिशूर आणि पलक्कड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तामिळनाडूमध्ये हवेमध्ये बदल दिसणार आहे. हवामान खात्याने सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला असून बचावकार्याच्या उपाययोजना करण्यासाठी अलर्ट दिला आहे.

- Advertisement -

चक्रीवादळ येण्याची शक्यता

हवामान खात्याच्यानुसार २०१५ मध्ये चेन्नईमध्ये आलेल्या पूरानंतर पुन्हा एकदा हवामानात बदल दिसत आहे. यावेळी दरवेळी पडणाऱ्या पावसापेक्षा १२ टक्के अधिक पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने चक्रीवादळ येण्याची देखील शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याचे केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी सांगितले. त्यांनी मच्छिमारांना देखील शुक्रवारनंतर समुद्रात जाऊ नये असे सांगितले.

एनडीआरएफच्या टीमची मागणी

केंद्राकडे एनडीआरएफच्या पाच कंपन्यांची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाला आवश्यक ती पाऊले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पर्यटकांनी उंच भागामध्ये खास करुन मुन्नारची यात्रा करु नये असा सल्ला केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी सांगितले. तर अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे केरळच्या मलमपूझा धरणाचे चार दरवाजे ९ सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -