घरदेश-विदेश'राम मंदिर' उभारणीपर्यंत आंदोलन सुरुच राहणार

‘राम मंदिर’ उभारणीपर्यंत आंदोलन सुरुच राहणार

Subscribe

राम मंदिर उभारणीपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सह-सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी दिला आहे.

राम मंदिर निर्मिती पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सह-सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी दिला आहे. ‘विद्यमान सरकारच्या (केंद्रातील भाजपा सरकार) निष्ठेबाबत कोणताच प्रश्न नाही. मात्र मंदिर उभारणीपर्यंत आंदोलन सुरु राहणार’, असल्याचे मत स्पष्ट केले आहे. दरम्यान याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरप्रश्नी मध्यस्थीसाठी ३ सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.

- Advertisement -

मोदी सरकारवर विश्वास

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सह-सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी राम मंदिरासाठी मोदी सरकारवर पूर्ण विश्वास असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच सत्तेत असणाऱ्यांचाही राम मंदिराला विरोध नाही, असे म्हणत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर विश्वास देखील दर्शवला आहे. अयोध्या वादावर मध्यस्थी करण्यासाठी सर्वोच्च् न्यायालयाकडून ३ सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. यावर भैयाजी जोशी म्हणाले की, मंदिरासाठी उचलण्यात आलेल्या कोणत्याही पावलांचे आम्ही स्वागत करतो. त्याचप्रमाणे त्याच जागी मंदिर होईल आणि त्यासाठी आम्ही कोणतीच तडजोड देखील करणार नाही. मध्यस्थ जर त्या दिशेने गेले तर आम्ही त्यांचे स्वागत करु. जेव्हा ३ सदस्यीय समिती यावर कार्यवाही सुरु करेल त्यावेळी सगळ्या गोष्टी समजतील. तसेच या समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. एफ.एम. कल्लीफुल्ला आहेत. तर इतर दोन सदस्यांमध्ये आध्यात्मिक गुरु रविशंकर आणि जेष्ठ विधिज्ञ श्रीराम पांचू यांचा देखील समावेश आहे.

८ आठवड्यांची वेळ निश्चित

१९८० ते १९९० पासून जे आंदोलन सुरु आहे. जोपर्यंत मंदिर पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरु राहिल. न्यायालयाने तत्परतेने यावर निर्णय घ्यावा, असे मत जोशी यांनी मांडले आहे. दरम्यान मध्यस्थी समितीसाठी न्यायालयाने आठ आठवड्यांची वेळ निश्चित देखील केली आहे.

- Advertisement -

वाचा – अयोध्या प्रकरण : श्री श्री रविशंकर यांच्या नावावरून वाद

वाचा – अयोध्याप्रकरणी त्रिसदस्यीय समितीच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -