घरताज्या घडामोडीया कारणामुळे ऋषि कपूर आणि राकेश रोशन यांची मैत्री तुटली

या कारणामुळे ऋषि कपूर आणि राकेश रोशन यांची मैत्री तुटली

Subscribe

ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांचे आज सकाळी निधन झाले असून त्यांच्या अशा जाण्याने संपूर्ण बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. पण याचनिमित्ताने ऋषि यांच्या जीवनातील अनेक गोष्टीही समोर येत आहेत. त्यात ऋषि यांच्या बॉलीवूडमधील मैत्रीचाही उल्लेख होत आहे. ऋषि कपूर यांच्या मनमोकळ्या व परखड बोलण्यामुळे त्यांची सहसा कोणाशी मैत्री होत नसे. पण ऋषि कपूर, राकेश रोशन व जितेंद्र यांच्यात जीवभावाची मैत्री होती. मात्र चित्रपटातील भूमिकेवरून ऋषि कपूर व राकेश रोशन यांच्यात वाद झाला आणि त्या दोघांची मैत्री तुटली ती कायमची.

ऋषि कपूर यांनी त्यांच्या बायोग्राफीतही याबद्दल लिहले आहे. काही वर्षांपूर्वी राकेश रोशन यांनी ऋषि कपूर यांना एका चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. पण त्यात ऋतिकच्या वडिलांची भूमिका ऋषि यांनी करावी असा आग्रह राकेश रोशन यांचा होता. पण ऋषि यांनी ही भूमिका खूपच छोटी असून यामुळे आपल्या करियरवर परिणाम होऊ शकतो. अशी शक्यता व्यक्त केली. यावर तुझे आता वय झाले आहे. आता कसले करियर घेऊन बसलाहेस. ज्या छोट्या मोठ्या भूमिका मिळतील त्या कर. कारण नंतर त्याही मिळणार नाहीत असे राकेश रोशन यांनी चिडून ऋषि यांना सांगितले. यामुळे ऋषि नाराज झाले व त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर मात्र या दोघांच्याही मैत्रीत अंतर आले. या दोघांमधील वादामुळे जितेंद्रही त्यांच्यापासून दुरावले.

- Advertisement -

त्यानंतर ऋषि कपूर यांना कर्करोग झाल्याचे समोर आल्यानंतर राकेश रोशन व जितेंद्र यांनी फोनवर ऋषि यांची विचारपूस केली. नंतर ऋषि कपूर उपचारांसाठी लंडनला गेले. गेल्या वर्षी ते भारतात परतल्यानंतर राकेश रोशन व जितेंद्र यांनी घरी जाऊन ऋषि यांची भेट घेतली. पण पूर्वीचे मैत्रीचे सूर मात्र त्यात नव्हते. असे एका मुलाखतीत ऋषि यांनी सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -