घरदेश-विदेशवाटाघाटीचं सूत्र ठरलं! पायलट यांना हवंय अर्थ-गृह मंत्रालयासह प्रदेशाध्यक्षपद

वाटाघाटीचं सूत्र ठरलं! पायलट यांना हवंय अर्थ-गृह मंत्रालयासह प्रदेशाध्यक्षपद

Subscribe

सचिन पायलट यांचा संदेश राजीव सातव केंद्रीय नेतृत्वाच्या वतीने जयपूरला पोहोचणार

राजस्थानमधील राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा काँग्रेसच्या बाजूने झुकताना दिसत आहे. सोमवारी दुपारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शंभरहून अधिक आमदारांची परेड करत शक्तीप्रदर्शन केलं. दरम्यान, वाटाघाटीचं सूत्र सचिन पायलट यांनी मांडलं आहे. हा संदेश घेऊन राजीव सातव केंद्रीय नेतृत्वाच्या वतीने जयपूरला पोहोचणार आहेत.

सचिन पायलट आपल्या चार आमदारांना मंत्री करावं अशी मागणी करीत आहेत. तसंच सचिन पायलट यांच्या मंत्र्यांना अर्थ आणि गृह मंत्रालय देण्यात यावं. तर प्रदेशाध्यक्षपदही सचिन पायलट यांच्याकडेच राहिलं पाहिजे, अशी अट सचिन पायलट यांनी घातली आहे. प्रियंका गांधी स्वत: या प्रकरणात सक्रिय आहेत आणि अशोक गेहलोत-सचिन पायलट यांच्याशी चर्चा करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – काँग्रेसचा ‘सचिन’ भाजपसाठी बॅटिंग करणार नाही


सचिन पायलट सतत २५ पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा करत होते, पण आता अशोक गेहलोत यांनी शंभराहून अधिक आमदारांची परेड केली आहे. अशा परिस्थितीत सचिन पायलट यांच्यावतीने सामंजस्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, परंतु आता काँग्रेस काय निर्णय घेणार आहे यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. सचिन पायलट बैठकीस येऊन त्यांचे प्रश्न मांडू शकतात, असं कॉंग्रेस पक्षाने सोमवारी दुपारी असे अपील केलं होतं. मात्र, सचिन पायलट यांनी सभेला जाण्यास नकार दिला होता. सचिन पायलट गेले दोन दिवस दिल्लीत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -