घरताज्या घडामोडीUP Election 2022: न्यूज चॅनेलच्या Opinion Poll वर बंदी घाला, 'सपा'ने...

UP Election 2022: न्यूज चॅनेलच्या Opinion Poll वर बंदी घाला, ‘सपा’ने लिहिले निवडणूक आयोगाला पत्र

Subscribe

उत्तर प्रदेशात 7 टप्प्यात निवडणूका होणार असून 10 फेब्रुवारी 14, 20,23,27 फेब्रुवारी,3मार्च आणि 7 मार्चला मतदान होणार आहे.

समाजवादी पार्टीने (Samajwadi Party)  रविवारी भारत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून सध्या न्यूज चॅनेलवर सुरु असलेल्या ओपिनिअन पोलवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी निवडणूक आयोगाकडे न्यूज चॅनेलवर सुरू असलेल्या पोलवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली असून हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाही या पत्राची प्रत पाठवण्यात आली आहे.

- Advertisement -

सपा प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी मुख्य निवडणूर आयुक्त, भारत निवडणूक आयोग आणि नवी दिल्ली यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की,8 जानेवारी रोजी उत्तर प्रदेश विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून 7 मार्च रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर 10 मार्चला 2022 रोजी निवडणूकांची मतमोजणी होणार आहे. मात्र त्याआधीच अनेक न्यूड चॅनेल्स ओपिनियन पोल्स दाखवत असून यामुळे मतदारांचा भ्रमनिरास होत असून निवडणूकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशात सध्या विधानसभा निवडणूकांचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. उत्तर प्रदेशात 7 टप्प्यात निवडणूका होणार असून 10 फेब्रुवारी 14, 20,23,27 फेब्रुवारी,3मार्च आणि 7 मार्चला मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी निवडणूकांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – UP Elections 2022: भारतातील सर्वात उंच व्यक्तीचा सपा प्रवेश, काय आहे उंचीचा रेकॉर्ड ?

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -