घरताज्या घडामोडीRanjitsingh Disle: शिक्षण मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर रणजितसिंह डिसले गुरुजींना अखेर रजा मंजूर

Ranjitsingh Disle: शिक्षण मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर रणजितसिंह डिसले गुरुजींना अखेर रजा मंजूर

Subscribe

फुलब्राइट ही भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त अभ्यासाचा विचार केला जातो त्यावेळी विचारात घेतली जाणारी अत्यंत प्रतिष्ठेची ही स्कॉरशिप आहे. जगातील केवळ 40 शिक्षकांना ही स्कॉलरशिप दिली जाते. 

ग्लोबर टीचर अवॉर्ड विजेते रणजित सिंह डिसले ( Ranjit Singh Disley sir ) यांना अखेर रजा मंजूर करण्यात आली असून 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर या काळात त्यांना रजा देण्यात आली आहे. त्यामुळे डिसले गुरुजींचा परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूण 153 दिवसांची सुट्टी डिसले गुरुजींना देण्यात आली आहे. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते डिसले गुरुजींना अमेरिकेतील फुलब्राइड स्कॉलरशिप मिळाली असून अमेरिकन शिक्षण पद्धतीचा सखोल अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली होती अनेक दिवस त्यांच्या मार्गात आडकाठी येत होती. सोलापूर जिल्हा परिषदेकडून आडकाठी केली जात होती मात्र अखेर शिक्षणमंत्र्यांनी या सगळ्याची दखल घेऊन याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश सोलापूर जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे डिसले गुरुजींची आता अमेरिकेत स्कॉलरशिप मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

फुलब्राइट ही भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त अभ्यासाचा विचार केला जातो त्यावेळी विचारात घेतली जाणारी अत्यंत प्रतिष्ठेची ही स्कॉरशिप असून डिसले गुरुजी हे भारतातील पहिले शिक्षक असतील ज्यांना अमेरिकेत जाऊन तिथल्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करुन भारतातील शिक्षण पद्धतीत काय बदल घडवता येतील याचा अभ्यास करता येणार आहे. ज्यांना या स्कॉलरशिपची संधी मिळते.त्यांच्यासाठी ही फार मोठी संधी असते. जगातील केवळ 40 शिक्षकांना ही स्कॉलरशिप दिली जाते.

- Advertisement -

अमेरिकेकडून डिसले गुरुजांनी  फुलब्राइट ही प्रतिष्ठित स्कॉलरशिप दिली. परदेशात शैक्षणिक संशोधनसाठी अमेरिका सरकारकडून फुलब्राइट स्कॉलरशिपसाठी त्यांची निवड झाली. पीस इन एज्युकेशन या विषयात डिसले गुरुजी संशोधन करणार असून  यासाठी त्यांना शासन परवानगीची आवश्यक होती मात्र शिक्षण विभाग यासाठी परवानगी देण्यास तयार नव्हते. शिक्षण मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर रणजितसिंह डिसले गुरुजींना अखेर रजा मंजूर करण्यात आली आहे.


हेही वाचा – शिक्षण अधिकार्‍यांची रणजित डिसलेंना धमकी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -