Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश बीजेपी खासदार साध्वी प्रज्ञा यांच्या तब्येतीत बिघाड, एम्स रुग्णालयात दाखल

बीजेपी खासदार साध्वी प्रज्ञा यांच्या तब्येतीत बिघाड, एम्स रुग्णालयात दाखल

भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा यांची तब्यत पुन्हा बिघडली असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Story

- Advertisement -

मध्य प्रदेशच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना शुक्रवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. प्रज्ञा ठाकुर यांना एम्स च्या प्राइव्हेट वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया हे स्वत: सांध्वी यांच्या तब्यतीकडे लक्ष ठेवून आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सांध्वी यांची प्रकृती आता स्थिर आहे. खासदार सांध्वी प्रज्ञा यांच्या डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी सांध्वी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांना डिचार्ज मिळाला. मात्र आता पुन्हा त्यांची तब्यत बिघडली आहे. ५० वर्षीय सांध्वी प्रज्ञा यांना बरेच आजार आहेत. त्यांना दमा, हायपरटेंशन, मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच इतरही काही व्याधी आहेत असे समजते.


हे ही वाचा- http://Live Update: मुंबईत जोरादार अवकाळी पावसाला सुरुवात

- Advertisement -