Sunday, February 28, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona In Maharashtra: चिंताजनक! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार पार!

Corona In Maharashtra: चिंताजनक! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार पार!

Related Story

- Advertisement -

राज्यात आज नवा कोरोना स्ट्रेन आढळल्याचे समोर आले आहे. पण हा स्ट्रेन ब्रिटन, ब्राझील, दक्षिण आफ्रिकामधील घातक असलेला कोरोनाचा स्ट्रेन नाही आहे. फक्त जुन्या कोरोना व्हायरसमध्ये म्युटेशन बदलले आहे. आज राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ६ हजारांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार ११२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ८७ हजार ६३२ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ७१३ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

आज दिवसभरात राज्यातील २ हजार १२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत १९ लाख ८९ हजार ९६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या ४४ हजार ७६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५५ लाख ८८ हजार ३२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ८७ हजार ६३२ (१३.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख २४ हजार ०८७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ५८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


हेही वाचा – अमरावती ,यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही – आरोग्य विभाग


- Advertisement -

 

- Advertisement -