Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Australian Open : डॅनिल मेदवेदेव्हचा अंतिम फेरीत प्रवेश; त्सीत्सीपासला केले पराभूत 

Australian Open : डॅनिल मेदवेदेव्हचा अंतिम फेरीत प्रवेश; त्सीत्सीपासला केले पराभूत 

ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठण्याची ही मेदवेदेव्हची पहिलीच वेळ ठरली.

Related Story

- Advertisement -

रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात चौथ्या सीडेड मेदवेदेव्हने ग्रीसच्या स्टेफानोस त्सीत्सीपासवर ६-४, ६-२, ७-५ अशी मात केली. ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठण्याची ही मेदवेदेव्हची पहिलीच वेळ ठरली. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात त्याच्यापुढे सर्बियाचा स्टार खेळाडू आणि अव्वल सीडेड नोवाक जोकोविचचे आव्हान असेल. जोकोविचने उपांत्य फेरीत रशियाच्या अस्लन कारात्सेवला ६-३, ६-४, ६-२ असे पराभूत केले होते.

अंतिम फेरी गाठल्याचा आनंद

शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात डॅनिल मेदवेदेव्हने त्सीत्सीपासवर ६-४, ६-२, ७-५ अशी मात केली. ‘हा सामना जिंकणे सोपे नव्हते. खासकरून तिसऱ्या सेटमध्ये त्सीत्सीपासने मला चांगली झुंज दिली. परंतु, मोक्याच्या क्षणी मी माझा खेळ उंचावला आणि अंतिम फेरी गाठली याचा आनंद आहे,’ असे सामन्यानंतर मेदवेदेव्ह म्हणाला.

मेदवेदेव्हचा आक्रमक खेळ

- Advertisement -

उपांत्य फेरीत पहिल्या सेटमध्ये २-२ अशी बरोबरी होती. यानंतर मात्र मेदवेदेव्हने आक्रमक खेळ करत हा सेट ६-४ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये त्सीत्सीपासने निराशाजनक खेळ केला. याचा फायदा घेत मेदवेदेव्हने हा सेट ६-२ असा जिंकत सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला ३-३ अशी बरोबरी झाली. त्यानंतर ५-५ अशी बरोबरी असताना मेदवेदेव्हने त्सीत्सीपासची सर्व्हिस मोडली. पुढे त्याने आपली सर्व्हिस राखत हा सेट ७-५ असा जिंकला आणि स्पर्धेत आगेकूच केली.

- Advertisement -