घरदेश-विदेशSarojini Naidu यांना का म्हटले जाते 'Nightingale of India'? पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या...

Sarojini Naidu यांना का म्हटले जाते ‘Nightingale of India’? पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या या खास गोष्टी

Subscribe

Sarojini Naidu Death Anniversary Today 2 March: ‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सरोजिनी नायडू यांची आज 2 मार्च रोजी पुण्यतिथी आहे. सरोजिनी नायडू या राजकीय कार्यकर्त्या, महिला हक्कांच्या समर्थक, स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा होत्या. प्रभावी भाषण शैली आणि प्रभावी लेखन शैलीमुळे त्यांना ‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’ म्हटले जाते.

सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील घोरेनाथ चट्टोपाध्याय हे हैदराबादच्या निजाम कॉलेजचे प्राचार्य होते. तर सरोजिनी यांनी मद्रास आमि लंडनमधील किंग्ज कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. सरोजिनी गोपाळकृष्ण गोखले यांना आपले राजकीय पिता मानले जातात. सरोजिनी यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. त्या काँग्रेसमध्ये सामील झाल्या आणि 1925 मध्ये त्यांना भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा करण्यात आल्या. पुढे देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांची उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

- Advertisement -

सरोजिनी नायडू यांना लहानपणापासूनच कवितांची आवड होती. सरोजिनी नायडू यांनी वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी साहित्यिक कारकिर्दीला सुरुवात केली. ‘माहेर मुनीर’ या नाटकातून त्यांना खरी ओळख मिळाली. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी सरोजिनी यांनी हैदराबादच्या निजामाकडून शिष्यवृत्ती मिळाली. यानंतर त्या लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये शिकण्यासाठी गेल्या.

भारतात प्लेगच्या साथीच्या काळात केलेल्या कार्याबद्दल त्यांना ब्रिटीश सरकारने ‘कैसर-ए-हिंद’ पदक प्रदान करत सन्मानित करण्यात आले. मात्र जालियनवाला बाग हत्याकांडानंतर निषेध म्हणून त्यांनी हा सन्मान परत केला. सरोजिनी नायडू यांचे 2 मार्च 1949 रोजी स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी लखनौ येथील शासकीय निवासस्थानात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेवटच्या श्वासपर्यंत त्या काम करत होत्या.

- Advertisement -

राजकीय नेत्यांकडूनही राजकीय कार्यकर्त्या आणि थोर समाजसेविका सरोजिनी नायडू यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले जात आहे.

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी थोर समाजसेविका सरोजिनी नायडू यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले आहे.

हजारो महिलांमध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण करणाऱ्या थोर कवयित्री सरोजिनी नायडू यांना पुण्यस्मरणदिनी विनम्र अभिवादन. असं ट्विट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

तर मुंबई काँग्रेसच्या ट्विटर हॅँटलवरूनही थोर कवयित्री सरोजिनी नायडू यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले आहे.


सलमान खानने खरंच सोनाक्षी सिन्हासोबत गुपचूप उरकले लग्न? जाणून घ्या सत्य

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -