घरदेश-विदेशसावरकरांनी नऊ वेळा इंग्रजांची माफी मागितली

सावरकरांनी नऊ वेळा इंग्रजांची माफी मागितली

Subscribe

सावरकरांनी एकदा, दोनदा नव्हे तर नऊ वेळा इंग्रजांची माफी मागितली. ते भीतीवर मात करू शकले नाहीत, अशी मुक्ताफळे पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उधळली आहेत. राजस्थानमधील अजमेर इथे झालेल्या काँग्रेसच्या सेवादलाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले की, महात्मा गांधी हेच महान होते. इंग्रजांनी १९२७ साली सेवादलावर बंदी घातली तेव्हा महात्मा गांधीं आणि इतर काँग्रेसचे अनेक नेते तुरुंगात गेले, पण ते कधी इंग्रजांपुढं झुकले नाहीत. गांधींजींना इंग्रजांची भीती नव्हती.

- Advertisement -

नागरिकत्व कायद्यामुळे भाजपने ईशान्य भारताला तणावाच्या वणव्यात लोटून दिले आहे. मात्र, आम्हाला हे प्रदेश प्रेमाने जिंकायचे आहेत. आम्हाला नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे. सेवादलाची ताकद वाढवायची आहे. द्वेषाने द्वेष जिंकला जाऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत मला, माझ्या कुटुंबाला, काँग्रेस पक्षाला दूषणे देत असतात, पण मी ते सगळे विसरून त्यांना संसदेत मिठी मारली. माझ्या त्या कृतीने त्यांच्या मनातील द्वेषावर मात केली, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

भाजप काँग्रेसमुक्त भारताची स्वप्ने पाहत असली तरी आम्ही त्यांना संपवणार नाही. त्यांची हत्या करणार नाही, पण २०१९ मध्ये त्यांना हरवणार आहोत. भाजपसाठी भारत ही एक वस्तू आहे, पण आमच्यासाठी हा देश सर्वांना सामावून घेणारा एक समुद्र आहे. प्रेम हाच या देशाचा मूळ स्वभाव आहे. इथे द्वेष फार काळ टिकत नाही आणि या देशात कुणालाही घाबरण्याची गरज नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

- Advertisement -

स्टेजवर राहुल गांधींचे घेतले चुंबन
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांनी आज राजस्थान आणि गुजरातचा दौरा केला. या दौर्‍यावेळी दोन्ही राज्यांत त्यांचे जोरदार स्वागत झाले. मात्र, या स्वागतादरम्यान राहुल गांधी यांना एका अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले. त्याचे झाले असे की, राहुल गांधी हे गुजरातमधील वलसाडच्या दौर्‍यावर असताना काही महिला कार्यकर्त्यांनी स्टेजवर येत त्यांचे स्वागत केले. यादरम्यान एका महिला कार्यकर्तीने चक्क राहुल गांधी यांना किस केले. या अनपेक्षित प्रकारामुळे राहुल गांधी यांचाही क्षणभर गोंधळ उडाला, तसेच भर स्टेजवर घडलेला हा प्रकार कॅमेर्‍यात कैद झाल्याने त्याची चर्चाही झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -