घरदेश-विदेश'या' सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका, दिवाळीला मिळणार अर्धाच बोनस

‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका, दिवाळीला मिळणार अर्धाच बोनस

Subscribe

केंद्र सरकारच्या टपाल कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी थोडी निराशाजनक असणार आहे. कारण यंदा टपाल कर्मचाऱ्यांनी दिवाळीचा बोनस अर्ध्याच मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाने या कर्मचाऱ्यांना १२० दिवसांचा बोनस देण्यास नकार दिला आहे. मंत्रालयाने सांगितले की, यंदा टपाल विभागाच्या पात्र कर्मचाऱ्यांना फक्त ६० दिवसांचा बोनस दिला जाईल.

भारत सरकारमधील सचिव अशोक कुमार यांच्या म्हणण्यानुसार, पोस्ट विभागाने एक प्रस्ताव पाठवला होता. ज्यात टपाल कर्मचाऱ्यांना १२० दिवसांचा Productivity Linked Bonus देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. पण मंत्रालयाने तो प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत टपाल कर्मचाऱ्यांना १२० दिवसांऐवजी ६० दिवसांचा Productivity Linked Bonus दिला जाईल.

- Advertisement -

सचिव अशोक कुमार यांच्या आदेशानंतर, डाक विभागाने आपल्या क्षेत्रीय कार्यालयांना माहिती पाठवली आहे की, ग्रामीण डाक सेवक, अनौपचारिक कामगार, गट बी, एमटीएस आणि गट ब चे नॉन राजपत्रित अधिकाऱ्यांना ६० दिवसांचा बोनस म्हणून ७००० रुपये मिळावी. यावर कोणतीही रक्कम बोनस म्हणून दिली जाणार नाही.

अखिल भारतीय लेखा आणि लेखापरीक्षण समितीचे सरचिटणीस एचएस तिवारी यांच्या माहितीनुसार, roductivity Linked Bonus काढण्याची पद्धत अगदी सोपी आहे. यात Basic Pay, S.B. Allowance, Deputation (Duty) Allowance, Dearness Allowance आणि Training Allowance यांचा समावेश आहे. यानंतर बोनसची रक्कम वार्षिक आधारावर काढली जाते.

- Advertisement -

यापूर्वी केंद्र सरकारने भारतीय रेल्वेला बोनस देण्याची घोषणा केली होती. मात्र जेसीएम, स्टाफ साइड ऑफिसर शिव गोपाल मिश्रा यांनी मात्र बोनसच्या रकमेबद्दल निराशा व्यक्त केली. त्यांच्या मते, रेल्वेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. यामुळे कामाचा ताण वाढला आहे. एकाच कर्मचाऱ्याला खूप काम करावे लागते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जास्त काम केले आहे, त्यांची बोनसची रक्कमही अधिक असावी.


Aryan Khanच्या सुटकेसाठी गौरीचा खानचा नवस, नोकरांना दिले ‘हे’ आदेश

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -