घरदेश-विदेशआर्यनला जामीन मिळाला पण इतरांच काय ?

आर्यनला जामीन मिळाला पण इतरांच काय ?

Subscribe

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलीवूडचा स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला २५ दिवसानंतर जामिन मिळाला. यामुळे सध्या खान कुटुंबीयांबरोबरच त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण आर्यनच्या या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मदन लोकुर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अजूनही जामिनासाठी २ लाख अर्ज प्रलंबित असून न्यायव्यवस्थेत बदल करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जामिनासाठी आर्यनच्या आधी अनेक आरोपींनी अर्ज केले होते. पण असे असतानाही उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामिनावरील सुनावणीला प्राधान्य देण्यात आले होते. यावर आक्षेप घेत एकाने न्यायालयात अर्ज केला होता. यावर एका कार्य़शाळेत बोलताना लोकुर यांनी आर्यनच्या जामिनावर भाष्य केले. आर्यनला जामिन मिळाला हे चांगलेच आहे. पण देशातील विविध न्यायालयात जामिनासाठी २ लाख अर्ज प्रलंबित आहेत. त्यांचे काय असा प्रश्न त्यांनी केला आहे.
यातील अनेक आरोपी फरार असून तर २२ लाख साक्षीदार न्यायालयातच येत नाहीत यामुळे तारखांवर तारखा पडत आहेत. त्यांचा निकाल कधी लागणार असा सवाल लोकुर यांनी केला आहे. त्याचबरोबर न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्याची वेळ आल्याचंही त्यांनी म्हटल आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -