घरताज्या घडामोडीबाळासाहेब असते तर विरोधकांच्या जीभा टाळूला चिकटल्या असत्या, संजय राऊतांचे वक्तव्य

बाळासाहेब असते तर विरोधकांच्या जीभा टाळूला चिकटल्या असत्या, संजय राऊतांचे वक्तव्य

Subscribe

बाळासाहेबांच्या आठवणी सांगताना संजय राऊत भावूक

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर आतासारखी राजकीय परिस्थिती नसती. जे आता समोर वचावचा बोलतात त्यांच्या जीभा टाळूला चिकटल्या असत्या असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. दरम्यान बाळासाहेबांच्या आठवणी सांगताना संजय राऊत भावूक झाले होते. राऊतांचे डोळेसुद्धा पाणावले होते. बाळासाहेबांचे दिवाळीच्या सणादरम्यान निधन झाले परंतु बाळासाहेबांसोबत काम करणं म्हणजे प्रत्येक दिवस उत्सवासारखा होता अशी भावना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी राऊतांना बाळासाहेबांसोबतची दिवाळीची आठवण काय असा प्रश्न विचारण्यात आला यावेळी बाळासाहेबांविषयी बोलताना राऊतांचे डोळे पाणावले होते. राऊत म्हणाले बाळासाहेबांसोबत रोज राहणे वावरणे ही सुद्धा दिवाळीच असायची, बाळासाहेब एक दिलदार, जिंदा दिल व्यक्तीमत्व होते. बाळासाहेबांना महाराष्ट्राची फार काळजी होती कोणाच्या घरात दिवाळी साजरी होते कोणाच्या नाही. याच्याविषयी ते माहिती घेऊन लोकांना मदत करायचे अशी आठवण संजय राऊत यांनी सांगितील.

- Advertisement -

दिवाळी आली की मला आठवण येते

बाळासाहेबांएवढे मोठं मन मी कोणाचे पाहिले नाही माझ्या आयुष्यात. त्यांच्यासोबत काम करणं एक उत्सव होता. त्यांच्यासोबत असताना आमचे फटाके फुटायचे ते शिस्तप्रीय होते मदत करायचे आणि काळजी करायचे, ऐन दिवाळीच्या काळात त्यांचे निधन झाले. दिवाळी आली का मला त्यांची आठवण येते दिवाळी सुरु झाल्यानंतर दोन दिवसांनी त्यांचे निधन झाले असे सांगताच संजय राऊत थोडे भावूक झाल्याचे पाहिले.

बाळासाहेब असते तर…..

मातोश्रीवर प्रचंड गर्दी असायची, लोक त्यांना भेटण्यासाठी रांग लावायचे ते ही सगळ्यांना भेटून चौकशी करायचे. बाळासाहेब असते तर ही राजकीय परिस्थिती कशी असती असा प्रश्न केला असता राऊत म्हणाले बाळासाहेब असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती. हे जे काही समोर वचावचा बोलत आहेत त्यांच्या जीभा टाळूला चिकटून असत्या. बाळासाहेब असताना कोणाची हिंमत होती, बाळासाहेब असताना सौ सुनार की एक लोहार की असे संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : केंद्रानंतर राज्य सरकार इंधनाचे दर कमी करेल ऐवढी दानत नाही, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -