घरताज्या घडामोडीराज ठाकरेंच्या भेटीसाठी संजय राऊत शिवतीर्थावर, मुलीच्या लग्नाचे दिलं निमंत्रण

राज ठाकरेंच्या भेटीसाठी संजय राऊत शिवतीर्थावर, मुलीच्या लग्नाचे दिलं निमंत्रण

Subscribe

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. शिवसेना प्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन केल्यानंतर संजय राऊत थेट राज ठाकरे यांच्या नव्या घरी शिवतीर्थावर पोहोचले. राऊतांनी राज ठाकरे यांची सपत्नीक भेट घेतली आहे. संजय राऊत मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरेंच्या घरी पोहोचले होते. मागील काही दिवसांपासून संजय राऊत पत्रिका देण्यासाठी प्रमुख नेत्यांच्या भेटी घेत आहेत.

खासदार संजय राऊत यांनी पहिले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी भेट दिली. राऊतांनी बाळासाहेबांना अभिवादन केल्यावर काही वेळ तिथे थांबले होते. शक्तीस्थळावरुन निघाल्यावर संजय राऊत यांनी थेट राज ठाकरेंचे घर गाठले. राज ठाकरे यांचे नवे घर शिवतीर्थ येथे राऊत गेले होते. राज यांच्या नव्या घरात जाणारे संजय राऊत हे पहिले शिवसेना नेते आहेत. काही दिवसांपुर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती परंतु तेव्हा राज यांनी नव्या घरात प्रवेश केला नव्हता. संजय राऊत यांनी तब्बल १६ वर्षानंतर राज ठाकरेंच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. तर एक वर्षाच्या कालावधीनंतर राज ठाकरे-संजय राऊत यांची भेट झाली आहे.

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यात चांगली मैत्री आणि कौटुंबिक संबंध आहेत. राऊतांच्या मुलीचे २९ नोव्हेंबर रोजी लग्न आहे. लग्नाची पत्रिका देऊन राज ठाकरेंना राऊतांनी निमंत्रण दिलं आहे. राऊत-राज यांची भेट तब्बल अर्धा तास चालली. संजय राऊत परत निघाल्यावर राज ठाकरे दारापर्यंत सोडायला आले होते. यावेळी राज ठाकरेंचा वेगळा लूक पाहायला मिळाला. राज ठाकरे यांच्यासोबत पत्नी आणि मुलगा अमित ठाकरेसुद्धा संजय राऊत यांना सोडण्यासाठी दारापर्यंत आले होते.


हेही वाचा :  Balasaheb Thackeray Death Anniversary: तेजस ठाकरेंनी बाळासाहेबांना केलं अभिवादन

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -