घरताज्या घडामोडीStock Markets Crash: नव्या व्हेरियंटचा शेअर बाजारावर परिणाम; गुंतवणुदारांचं कोट्यावधीचं नुकसान!

Stock Markets Crash: नव्या व्हेरियंटचा शेअर बाजारावर परिणाम; गुंतवणुदारांचं कोट्यावधीचं नुकसान!

Subscribe

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. या नव्या व्हेरियंटमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. गुंतवणुदारांचं लाखो, कोट्यावधींचं नुकसान झाल्याचे समोर आले आहेत. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नवा व्हेरियंट शरीरातील रोग प्रतिकारशक्तीवर मात करण्यास सक्षम असण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. आतापर्यंत सर्वात धोकादायक हा व्हेरियंट असू शकतो, असे ब्रिटनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लस या नव्या व्हेरियंटवर परिणाम करत नसून त्याचा परिणाम खूप वाईट असून शकतो, अशी सर्वात मोठी चिंता आहे. आतापर्यंत हा व्हेरियंट दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, हाँगकाँगमध्ये आढळला आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे सलग सातव्या दिवशी परदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर्सची विक्री केली जात आहे आणि यामुळे शेअर बाजारात नकारात्मक वातावरण पसरले आहे. तसेच असे देखील म्हटले जात आहे की, युरोपमधील अलीकडे कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे, यामुळे शेअर बाजारात याचे वाईट परिणाम झाले आहेत. शेअर बाजाराच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स १४१६ अंकांनी म्हणजे जवळपास २.४१ टक्क्यांनी घसरला आणि ५७,३७८वर आला. तर निफ्टी ४१९ अंकांनी म्हणजे २.३९ टक्क्यांनी घसरला आणि १७,११७वर पोहोचला होता. निफ्टीसाठी १७,०००ची पातळी खूप महत्त्वाची होती. त्याच्या खाली गेल्यानंतर मोठी घसरण होण्याची शक्यता आहे,.

- Advertisement -

जरी एकाबाजूला निफ्टी, सेन्सेक्समध्ये घसरण होत असली तरी दुसऱ्या बाजूला फार्मा शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. डॉ. रेड्डीजचा शेअर्स दीड टक्क्यांची वाढला असून सिप्ला आणि सनफार्मचे शेअर्स वेगाने वाढत आहे.

शेअर बाजारात घसरण होण्याचे मुख्य कारण

- Advertisement -

कोरोनाचा नवा व्हेरियंट
काही देशांनी लॉकडाऊनची केली घोषणा
परदेश गुंतवणुकदारांकडून विक्री
रोखे उत्पन्नात घट


हेही वाचा – South Africa Corona Variant: कोरोनाचा नवा व्हेरियंट B.1.1.529 एड्स रुग्णापासून म्युटेट झाला?


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -