South Africa Corona Variant: कोरोनाचा नवा व्हेरियंट B.1.1.529 एड्स रुग्णापासून म्युटेट झाला?

New Covid Variant B.1.1.529 Evolved from AIDS Patient?
कोरोनाचा नवा व्हेरियंट B.1.1.529 एड्स रुग्णापासून म्युटेट झाला?

दक्षिण आफ्रिकमध्ये कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट आढळला आहे, ज्यामुळे अधिक वेगाने कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. गुरुवारी या व्हेरियंटच्या २२ रुग्णांची नोंद झाली. लंडनच्या इंम्पिरिअल कॉलेजचे विषाणूशास्त्रज्ञ डॉ. टॉम पीकॉक यांनी आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या ट्वीटर अकाऊंटवर कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट B.1.1.529 बाबत तपशील पोस्ट केली होती. तेव्हापासून शास्त्रज्ञ या नव्या व्हेरियंटवर संशोधन करत आहे. ब्रिटनने अजूनपर्यंत चिंता निर्माण करणाऱ्या श्रेणीत अधिकृतपणे या व्हेरियंटची नोंद केली नाही.

या नव्या व्हेरियंटमुळे वेगाने संक्रमण होण्याच्या इशाऱ्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ या व्हेरियंटवर अधिक संशोधन करत आहे. दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजने (NICD) दक्षिण आफ्रिकेत B.1.1.529 हा नवा व्हेरियंट आढळल्याचे सांगितले. जीनोम सिक्वेंसिंग नंतर B.1.1.529 चे २२ रुग्ण आढळल्याचे समोर आले.

NICDचे प्रभारी कार्यकारी संचालक प्रोफेसर एड्रियन प्युरेन यांनी म्हटले की, यामध्ये आश्चर्यकारक कोणताही बाब नाही की, दक्षिण आफ्रिकेत नवा व्हेरियंट आढळला आहे. सध्या या व्हेरियंटचे जास्त रुग्ण आढळले नाहीत. पण आमचे शास्त्रज्ञ नव्या व्हेरियंट समजण्यासाठी सर्व स्थापित मॉनिटरिंग सिस्टमद्वारे सतत काम करत आहे. सर्वात पहिल्यांचा कोरोनाच्या नवा व्हेरियंट B.1.1.529 बोत्सवाना आढळला होता.

कोणत्या देशात या व्हेरियंटचे रुग्ण आढळले?

११ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवानामध्ये या व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर तीन दिवसांनी या व्हेरियंटच्या आणखीन काही केसेस आढळल्या. दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त हाँगकाँमध्येही या व्हेरियंटचा रुग्ण आढळला होता. हाँगकाँगमध्ये ३६ वर्षीय व्यक्ती दक्षिण आफ्रिकेत गेला होता आणि २२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबरपर्यंत तो तिथे राहिला. १३ नोव्हेंबरला क्वारंटाईनदरम्यान त्याच्यामध्ये नवा व्हेरियंट असल्याचे कळाले.

नव्या व्हेरियंटमध्ये आढळलेले म्युटेशन P681H हे Alpha, mu, गामा आणि B.1.1.318 व्हेरियंटमध्येही नोंदवले आहे. नव्या व्हेरियंटमध्ये N679K म्युटेशन देखील आहे, जो इतर व्हेरियंटमध्येही आहे. तसेच नव्या व्हेरियंटमध्ये N501K नावाचे म्युटेशन आहे. ज्याची व्हेरिएंट ऑफ कंसर्नमध्ये नोंद केली आहे. अध्यनात दावा केला आहे की, हे म्युटेशन व्हेरियंटला अधिक संक्रमक बनवतो. यामुळे व्हायरस मानवी अँजिओटेन्सिन-कन्व्हर्टिंग एन्झाइम 2 (ACE2) रिसेप्टर्सच्या संपर्कात सहज येतो.

शास्त्रज्ञ का आहेत चिंतेत?

शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, असे म्युटेशन शरीराच्या सुरक्षा कवचला चकमा देऊन व्यक्तीला खूप आजारी बनवू शकते. तीन देशांमध्ये आतापर्यंत फक्त २२ रुग्ण आढळले आहेत. परंतु यामुळे लोकांमध्ये आणि शास्रज्ञांमध्ये दहशत पसरली आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, कॉम्प्युटेशनल सिस्टम्स बायोलॉजीचे प्राध्यापक आणि UCL जेनेटिक्स इन्स्टिट्यूटचे संचालक फ्रँकोइस बॅलॉक्स यांनी इशारा दिला की, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तीमध्ये तीव्र संक्रमणादरम्यान हा नवीन व्हेरियंट विकसित झाल्याची शक्यता आहे. तसेच ही रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली व्यक्ती कदाचित एक एचआयव्ही/एड्सचा रुग्ण होता ज्याने अद्याप उपचार सुरू केले नाहीत.

आतापर्यंत किती व्हेरियंट आढळले?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, आतापर्यंत ४ व्हेरियंट आढळले आहेत. ज्यामध्ये अल्फा ( B.1.1.7, ‘यूके वेरिएंट’), बीटा ( B.1.351, ‘ दक्षिण अफ्रीका वेरिएंट’), गामा (P.1, ‘ब्राजील वेरिएंट’) आणि डेल्टा (B.1.617.2)चा समावेश आहे.


हेही वाचा – Super Variant : नव्या Covid-19 व्हेरीयंटमुळे Alert ! केंद्राची राज्यांसाठी नवी नियमावली