घरदेश-विदेशCorona Vaccination: भारतात सिरमची दुसरी लस येणार

Corona Vaccination: भारतात सिरमची दुसरी लस येणार

Subscribe

देशात कोरोना लसीकरणा मोहिम वेगाने सुरु आहेत. सध्या दोन लसींच्या वापराला मान्यता आहे. यात आता अमेरिकन कंपनी नोव्हाव्हॅक्स आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी विकसित केलेली ‘कोव्होव्हॅक्स’ ही लस बाजारात दाखल होत आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत ही लस बाजारात उपलब्ध होईल त्यानंतर एप्रिल महिन्यात लसीच्या मानवी चाचण्यांना भारतात सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ब्रिटनमध्ये या लसीची ८९.३ टक्के परिणामकारकता सिद्ध झाली.

यानंतर आता भारतातही मानवी चाचण्या सुरु करत लसीचे उत्पादन केले जाणार आहे. यासाठी परवानगी मिळाल्यावर तत्काळ वितरण सुरु करण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट तयार करत आहे. कोव्होव्हॅक्सचे २० डोस पुरवण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट नियोजन करत आहेत. याबाबत अदर पूनवाला यांनी ट्विटरवरून सांगितले, भारतात कोव्होव्हॅक्स लसीच्या चाचण्या सुरु करण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. कारण लसीची परिणामकारकता सिद्ध झाली आहे. यामुळे जून २०२१ पर्यंत कोव्होव्हॅक्स च्या प्रत्यक्ष वापरास सुरुवात होईल, असे ट्विटमधून स्पष्ट केले.

- Advertisement -

अमेरिकेच्या नोव्हाव्हॅक्स या कंपनीने ऑगस्ट २०२० मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे संशोधन आणि उत्पादनासाठी सिरम इन्स्टिट्यूटशी करार केला. सिरम इन्स्टिट्यूटशी केलेल्या विशेष करारामुळे या कंपनीला भारतात लसीचे उत्पादन करण्याचे मान्यता मिळाली. कोरोना संसर्गाच्या काळात काही देश वगळत अनेक देशांमध्ये सिरम इन्स्टिट्यूटला नोव्हाव्हॅक्स लसी उत्पादन करण्यासाठी परवानगी मिळाली. सर्व परवानग्या आणि चाचण्या यशस्वी झाल्यास भारतातही ‘कोव्होव्हॅक्स’ या तिसऱ्या लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी मिळणार आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही मोठी गोष्ट असणार आहे.


 

- Advertisement -

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -