घरदेश-विदेशचर्चमधील पाद्रीकडून विवाहितेचे लैंगिक शोषण

चर्चमधील पाद्रीकडून विवाहितेचे लैंगिक शोषण

Subscribe

चर्चमधील कन्फेशन खोलीत एका विवाहित महिलेने तिच्याकडून घडलेल्या चुकीच्या कृत्याची कबुली दिली. त्या प्रकरणावरून पाद्रीने त्या महिलेला ब्लॅकमेल केले. तसेच तिचे लैंगिक शोषण करत अश्लील फोटो काढून ते सार्वजनिक करण्याची धमकीही दिली.

चर्चमधील कन्फेशन खोलीत एका विवाहित महिलेने तिच्याकडून घडलेल्या चुकीच्या कृत्याची कबुली दिली. त्या प्रकरणावरून पाद्रीने त्या महिलेला ब्लॅकमेल केले. तसेच तिचे लैंगिक शोषण करत अश्लील फोटो काढून ते सार्वजनिक करण्याची धमकीही दिली. केरळमधील कोट्ट्यम शहरातील एका चर्चमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी चर्च व्यवस्थापनाने चौकशी समिती नेमली असून चौकशी अहवाल येईपर्यंत पाद्रीला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. संबंधित पीडित महिलेने हा प्रकार जेव्हा तिच्या पतीला सांगितला, तेव्हा पतीने यासंदर्भात चर्चमधील वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यानंतर चर्च व्यवस्थापनाने उपरोक्त कारवाई केली.

कन्फेशन रुममधील कबुलीचा घेतला गैरफायदा

चर्चमधील कन्फेशन खोलीत एखाद्याने चुकीची कबुली दिल्यानंतर ती गोपनीय ठेवणे बंधनकारक असते. मात्र, पाद्रींनी याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. महिलेने तिच्या प्रेमसंबंधाची कबुली दिल्यानंतर पाद्रींनी या आधारे तिला ब्लॅकमेल केले. यातील एका पाद्रीने तिचे लग्नापूर्वी लैंगिक शोषण केले होते. महिलेने हा प्रकार कन्फेशन खोलीत सांगितला होता. कन्फेशन खोलीतील पाद्रीने हा प्रकार ऐकताच त्याने देखील महिलेला ब्लॅकमेल केले आणि तिचे शोषण केले. विवाहितेचे अश्लील फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देखील त्या पाद्रीने दिल्याचा आरोप विवाहितेच्या पतीने केला आहे.

- Advertisement -

तक्रार मागे घेण्यासाठी दबाव

तक्रार मागे घेण्यासाठी चर्चमध्ये येणाऱ्या बड्या मंडळींकडूनही माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचे विवाहितेच्या पतीचे म्हणणे आहे. मात्र तरीही पती-पत्नींनी यावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -