घरताज्या घडामोडीशाहीन बागमध्ये गोळी झाडणारा आपचा कार्यकर्ता?

शाहीन बागमध्ये गोळी झाडणारा आपचा कार्यकर्ता?

Subscribe

शाहीनबागमध्ये आंदोलकांना धमकावून हवेत गोळीबार करणारा कपिल बैसला वर्षभरापूर्वी आम आदमी पक्षाच्या कार्यक्रमात दिसला होता, असा दावा आता दिल्ली पोलिसांकडून केला जात आहे.

गेल्या काही दिवासांपासून शाहीन बागमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. अनेक आंदोलक गे्या ५० दिवसांपासून इथे आंदोलन करत आहेत. १ फेब्रुवारी रोजी कपिल बैसला नावाच्या एका तरुणाने शाहीन बागमध्ये येऊन हवेत दोनदा गोळीबार केला. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, आता शाहीन बागमधे गोळी झाडणारा आपचा कार्यकर्ता असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दिल्लीचे पोलीस उपायुक्त राजेश देव यांनी हा दावा केला आहे. यासाठी त्यांनी वर्षभरापूर्वीचा आम आदमी पक्षाच्या कार्यक्रमातला कपिल बैसलचा एक फोटो देखील दाखवला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला तीन दिवसच शिल्लक राहिले असताना हा फोटो समोर आल्यामुळे भाजपनं आम आदमी पक्षाच्या विरोधात रान उठवायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे मुख्य प्रवर्तक अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘या तरुणावरून सुरू असलेला वाद म्हणजे भाजपचा निवडणूक स्टंट आहे. भाजप यासाठी दिल्ली पोलिसांचा वापर करत आहे. दर कपिल बैसलाचे आम आदमी पक्षाशी संबंध असतील, तर त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी. पण हा निवडणुकांआधीचा राजकीय स्टंट आहे’, असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, कपिल बैसलाच्या नातेवाईकांनी मात्र त्याचा कोणत्याही पक्षाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. ‘कपिल वर्षभरापूर्वी त्याच्या वडिलांसोबत आपच्या कार्यक्रमाला गेला होता. त्याचे वडील राजकारणात सक्रीय आहेत. पण ते देखील आधी बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून पराभूत झाले होते. त्यानंतर थेट वर्षभरापूर्वीच्या आपच्या कार्यक्रमात तो वडिलांसोबत गेला होता’, असं त्याचे काका जोगेंदर नागर यांनी सांगितलं आहे.


वाचा सविस्तर – जामियानंतर आता शाहीनबागमध्ये आंदोलकांवर गोळीबार!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -