घरदेश-विदेशपवार साहेब, कृषी सुधारणांवर नरेंद्र मोंदीपेक्षाही तुमचा जास्त दावा - रविशंकर प्रसाद

पवार साहेब, कृषी सुधारणांवर नरेंद्र मोंदीपेक्षाही तुमचा जास्त दावा – रविशंकर प्रसाद

Subscribe

केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी कृषी विधेयकांना विरोध

नव्या कृषी विधेयकाला विरोध करतानाची विरोधी पक्षांची दुटप्पी भूमिका समोर येत असल्याची माहिती कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. विरोधकांकडून फक्त आपले अस्तित्व टिकवण्यासाठीच नरेंद्र मोदी सरकारच्या नव्या कृषी विधेयकांना विरोध होत आहे. ही केवळ शुद्ध राजनैतिक रणनिती असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. नव्या कृषी विधेयकांना विरोध करणाऱ्यांपैकी एक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच २०१० पाठवलेल्या पत्रांचा दाखलाही यावेळी रविशंकर प्रसाद यांनी दिला. शरद पवार यांची सध्याची भूमिका दुटप्पी असल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. कृषी उत्पन्न बाजार समिती संपायला हवी अशा आशयाची भूमिका विरोधकांकडून वारंवार घेण्यात आली आहे. पण आज विरोधी पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा पुर्नउच्चार त्यांनी केला.

आदरणीय शरद पवार आपण तरी अनुभवी नेता आहात. अनेक मुख्यमंत्री पदी तर केंद्रात मंत्री पदावरही आपण राहिला आहात. तुम्ही पाठवलेली दोन्ही पत्रे मी वाचली आहेत. तसेच तुमच्या मुलाखतीही मी वाचल्या आहेत. नरेंद्र मोदी सरकारपेक्षाही तुम्ही जास्त कृषी सुधारणांवर दावा करत आला आहात आणि आज तुम्हीच विरोधात आहात असे रविशंकर प्रसाद म्हणाले. केवळ शुद्ध राजनैतिक रणनिती फक्त आपले अस्तित्व टिकवण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. याबाबतचे मी तुम्हाला पुरावे देऊ शकतो. केवळ आपले अस्तित्व वाचवण्यासाठी नरेंद्र मोदींना विरोध होतोय अशा शब्दात त्यांनी विरोधी पक्षांवर यावेळी टीका केली.

- Advertisement -

समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनीही या आंदोलनात उडी घेतल्याने, त्यांनाही काही आठवणी रविशंकर प्रसाद यांनी यावेळी करून दिल्या. रविशंकर प्रसाद म्हणाले की, मी विनम्रतेने आठवण करून देऊ इच्छितो की, कृषी स्थायी समितीचा अहवाल आहे, ज्यामध्ये तुमचे वडिल मुलायम सिंह यादव हेदेखील सदस्य आहेत. तुमचे वडिल मुलायमसिंह यादव हे समाजवादी पक्षाच्या धोरणाचा शेवटचा आवाज आहे, असे मला वाटते. त्यांनीही म्हटल्यानुसार शेतकऱ्यांना बाजारा समित्यांपासून मुक्त केले जावे अशी मागणी त्यांनी केली होती. समाजवादी पक्ष असो वा शिवसेना या दोन्ही पक्षांनी संसदेत या कायद्याचे समर्थन केले आहे. काही सुधारणा सुचवल्या खऱ्या, पण त्यांनी या कायद्याला समर्थन केले होते. हे सगळ रेकॉर्डवर आहे, मला वेगळ सांगायची गरज नाही. राजकीय पक्षांना येऊ नका सांगत असतानाही शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी राजकीय पक्ष पुढे येत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


 

- Advertisement -

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -