घरदेश-विदेशतुम्ही शिमल्याला जाण्याचा प्लॅन करतायत; मग हे नक्की वाचा

तुम्ही शिमल्याला जाण्याचा प्लॅन करतायत; मग हे नक्की वाचा

Subscribe

पर्यटकांसाठी कूल डेस्टिनेशन असणारे हिमाचल प्रदेश राज्यातील शिमल्यातील नागरिक सध्या पाणी टंचाईने ग्रस्त आहेत. या अभूतपूर्व टंचाईमुळे शिमल्यात पाण्याचा अपव्यय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाणी टंचाईचा सर्वात मोठा फटका शिमल्याच्या पर्यटनाला बसला आहे. त्यामुळे तुम्ही जर थंडाव्यासाठी शिमल्याला जाणार असाल तर या बातमीचा नक्की विचार करा. पाणी टंचाईमुळे शिमला महापालिकेने दरवर्षी साजरा केला जाणारा ग्रीष्म उत्सवही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिदिन २० हजार पर्यटक

शिमला येथे दरवर्षी १ जुन रोजी ग्रीष्म उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव बघण्यासाठी येथे प्रतिदिन २० हजार पर्यटक भेट देतात. पर्यटकांच्या गर्दीचा परिणाम तेथे उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर होतो. शिमल्याची लोकसंख्या पाहता दर दिवशी ४५ दक्षलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र सद्यस्थितीत त्यांना १८ दक्षलक्ष लीटर पाणी देण्यात येत आहे. कमी पाणी पुरवठ्यामुळे स्थानिक नागरिकांनी पर्यटनावर काही काळ बंदी आणण्याची मागणी केली आहे. सध्या शिमल्यात नळाने पाणी येत नसल्यामुळे स्थानिकांना टँकरने पाणी पुरवले जात आहे.

- Advertisement -

पाण्याचा हिशेब द्या – उच्च न्यायायल

पाणी संकटामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊ नये, यासाठी उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. सामान्य नागरिकाबरोबरच तेथील मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनाही टँकरने पाणी पुरवणार नसल्याचे आदेश न्यायालयाने दिले. यानंतर मुख्य न्यायाधीश, अन्य न्यायाधीश, मंत्री आणि अन्य शासकिय अधिकाऱ्यांकडे टँकरने केलेला पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तसेच वापरल्या गेलेल्या पाण्याचा हिशोब तेथील महापालिकेने, द्यावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पर्यंटकाची प्रतिक्रिया

शिमला हे थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे भारत आणि परदेशातूनही अनेक पर्यटक येत असतात. शिमला सारख्या शहरात पाणी समस्या उद्भवने, हे अनपेक्षित आहे. जर ही समस्या शिमला शहरात निर्माण होत असेल तर हिमालयाच्या कोणत्याही भागात भविष्यात उद्भवू शकते. यावर्षी येथे भरपूर पाऊस पडणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणी समस्या नष्ट होईल आणि लोकांना सुखी जीवन जगता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -