घरदेश-विदेशसुएझ कालव्यात फसले जहाज अन् समुद्रातही झाला ट्राफिक जाम

सुएझ कालव्यात फसले जहाज अन् समुद्रातही झाला ट्राफिक जाम

Subscribe

वाऱ्याच्या वेगामुळे फसलेले हे जहाज बाहेर काढण्यास वेळ लागू शकतो.

आपण रस्त्यावर ट्राफिक जाम झाल्याचे नेहमी पाहत असतो. परंतु आता समुद्रात ट्राफिक झाल्याचे वृत्त समोर येत आहे. सुएझ कालव्यात चीनमधून माल घेऊन जाणारे एक विशाल कंटेनर जहाज एवरग्रिन अडकल्याने मोठ्या प्रमाणात ट्राफिक झाले आहे. हे जहाज हवेच्या प्रचंड झोक्यामुळे समुद्रात फसले आहे. या जहाजामुळे जगातील सागरी मार्गातील वाहतूक ठप्प झाली आहे. याची माहिती जहाजाच्या ऑपरेटिंग कंपनीने दिली आहे. या कंटेनर जहाजावर पनामाचा झेंडा लावलेला आहे. १९३.३ कीलोमीटर लांब असलेला सुएज कालवा भूमध्य सागराला लाल सागराशी जोडतो. मंगळवारी सुएज कालवा पार करताना ४०० मीटर लांब असलेला आणि ५९ मीटर रुंद असलेले जहाज समुद्रात फसले आहे. त्यामुळे जलवाहतूकीत अडथळा निर्माण होणार आहे. हे जहाज हलवण्याचे प्रयत्न सुरु असून, मोठ्या प्रमाणात टग बोट्स तैनात केल्या आहेत. सुएज कालवा हा ईजिप्तच्या संयोगभूमीतून खोदलेला एक कालवामार्ग आहे. सुएज कालवामार्ग हा जगातील गजबजलेल्या जलमार्गांपैकी एक आहे. अरेबियन आखाती देशांतील खनिज तेल क्षेत्राकडून युरोपकडे खनिज तेल वाहून नेणाऱ्या तेलवाहू जहाजांची संख्या सर्वाधिक आहे.

दरम्यान जहाज अडकल्याने लाल सागर आणि भूमध्य सागराच्या किनाऱ्यांवर मोठ्या संख्येने जहाजांचा ट्राफिक जाम झाला आहे. वाऱ्याच्या वेगामुळे फसलेले हे जहाज बाहेर काढण्यास वेळ लागू शकतो. ऑपरेटिंग कंपनीने जहाजाच्या मालकाला या घटनेचे नेमके कारण काय हे शोधून काढण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पुण्यात कोरोनाचे थैमान! धुळवड साजरी करण्यास येणाऱ्या पर्यटकांवर निर्बंध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -