घरमहाराष्ट्रऑनलाईन तिकीट बुकींगमधून IRCTC ला मिळणार कोट्यावधींचा महसूल बुडाला

ऑनलाईन तिकीट बुकींगमधून IRCTC ला मिळणार कोट्यावधींचा महसूल बुडाला

Subscribe

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची माहिती

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिट बुकिंगमधील अडचणी दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ( IRCTC ) वेबसाईट सुरु केली. या वेबसाईटच्या माध्यामातून प्रवासी रेल्वेचे तिकिट ऑनलाईन बुकिंगची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना रंगेत उभे राहावे लागत नसल्याने प्रवाशांनी ऑनलाईन रेल्वे तिकिट बुकिंगला चांगला प्रतिसाद दर्शवला आहे. याच फायदा रेल्वे प्रशासनाला देखील मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होत होती. मात्र कोरोना संसर्ग वाढत असल्याने रेल्वे बंद करण्यात आली. याचा परिणाम रेल्वेच्या महसुलावर झाला आहे. त्यामुळे चालू वर्षात मिळणार कोट्यावधींचा महसुल बुडाला आहे.

नुकताच इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ( IRCTC )या वेबसाईटच्या माध्यामातून प्रवाशांनी केलेल्या ऑनलाईन तिकिट बुकिंगमुळे गेल्या दोन वर्षात जमा झालेले उत्पन्नाची माहिती जाहीर केली. यामध्ये २०१८ – २०१९ या पहिल्याच वर्षात रेल्वेला ३२, ०७० कोटी रुपयाचे उत्पन्न मिळाले. तर २०१९ ते २०२० या कालावधीत ३४,०५५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. यानंतर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत रेल्वेला फक्त १४,९१५ कोटी रुपय उत्पन्न रेल्वेला मिळाले. कोरोना संसर्गामुळे रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याने याचा फटका उत्पन्नावर बसला त्यामुळे २०२० ते फेब्रुवारी २०२१ मध्ये रेल्वेला फक्क १४ कोटी रुपयांवर समाधान मानावे लागले. अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत दिली.

- Advertisement -

रेल्वेच्या या ऑनलाईन वेबसाईटमुळे प्रवाशांना तिकिट बुक करणे, रद्द करणे सोप्पे झाले आहे. त्यामुळे ऑनलाईन तिकिट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्याचप्रमाणे रेल्वेने आयआरसीटीसी या वेबसाईटमध्ये ऑनलाईन पार्सल सेवाही दिली आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांमधून मालाची वाहतूक करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना ठरावीक ई-पेमेंट करत पार्सल पाठवता येते. या ऑनलाईन पार्सलच्या माध्यामातून वेबसाईटला २०१९ -२० मध्ये ७६.१६ टक्के उत्पन्न मिळाले आहे. त्यात २०२०- २१ मध्ये वाढ होत उपत्न ८३.७७ टक्के झाले आहे.

रेल्वे स्थानकावरील कॅटींग, तिकीट बुकिंह आणि पर्यटन या क्षेत्रात इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ( IRCTC ) ही कंपनीची मक्तेदारी आहे. शिवाय रेल्वेच्या पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचा व्यवसाय देखील चांगली कामगिरी करत आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -