घरताज्या घडामोडी'हा' SmS तुमचे बँक खाते करु शकतो रिकामं! बँकेने दिला सतर्कतेचा इशारा

‘हा’ SmS तुमचे बँक खाते करु शकतो रिकामं! बँकेने दिला सतर्कतेचा इशारा

Subscribe

सध्या एक एसएमएस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्या एसएमएसला क्लिक केल्यास तुमचे बँक खाते रिकामं होऊ शकते. त्यामुळे बँकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले. दरम्यान, या काळात अनेक सायबर हल्ले देखील वाढू लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतातील पायाभूत सुविधा, बँकिंग आणि माहिती क्षेत्रात सायबर हल्ल्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता सध्या एक एसएमएस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्या एसएमएसला क्लिक केल्यास तुमचे बँक खाते रिकामी होऊ शकते. त्यामुळे बँकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोणता SmS होत आहे व्हायरल

कोरोना विषाणूची लोकांमध्ये भीती असून या भितीचा फायदा घेत अनेक सायबर हल्ले होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या नागरिकांच्या मोबाईलवर कोविड-१९ची मोफत तपासणी केली जात असल्याचा एसएमएस सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, अशी कोणतीही मोफत तपासणी केली जात नसून कोणत्याही बँक खातेदारानी त्या एसएमएसच्या लिंकवर क्लिक करु नये, असा सतर्कतेचा सर्वच बँकेकडून इशारा दिला जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, बँक ऑफ बडोदा या बँकेने देखील त्यांच्या खातेदारांना सतर्कतेचा इशारा दिला असून ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन बँकिंगचा वापर करताना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कारण तुम्ही जर त्या लिंकला क्लिक केले तर तुमची सर्व बँक डिटेल्स समोरच्या व्यक्तीला मिळून तुमचे खाते रिकामी होऊ शकते. त्यामुळे कोविड-१९ मोफत तपासणी असा एसएमएस आल्यास त्यावर क्लिक करु नका, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.


हेही वाचा – दिल्लीच्या आरोग्यमंत्र्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; आज मिळणार डिस्चार्ज

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -