घरदेश-विदेशलातूरमधील रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता विभागात आग

लातूरमधील रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता विभागात आग

Subscribe

मनुष्यहानी नाही

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच लातूरमधील रुग्णालयात आगीची घटना घडली आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात बालक अतिदक्षता विभागात आग लागली आणि एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही.

नवजात बालक अतिदक्षता विभागात आग लागल्यानंतर कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत ही आग विझवली आहे.

- Advertisement -

रुग्णालयात देवीच्या फोटोपुढे दिवा लावल्यामुळे काच तडकून खाली पडली आणि पेपरला आग लागली. अतिदक्षता विभागात ही आग पसरली आणि त्यानंतर शॉर्टसर्किटमुळे आग आणखीनच वाढल्याचे सांगण्यात येत आहे. या अतिदक्षता विभागात २७ बालके उपचार घेत आहेत. त्यापैकी एक बालक व्हेंटिलेटरवर आहे. या सर्व बालकांना कर्मचार्‍यांनी सतर्कता दाखवत इतरत्र हलवून होणारा अनर्थ टळला.

दरम्यान, अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी ४ जणांचा होरपळून तर ६ जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता. लातूरच्या रुग्णालयात आग लागली तेव्हा अतिदक्षता विभागात २७ बालके उपचार घेत होती. मात्र, त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी घलवण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -