घरदेश-विदेशGoodNews! सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या, आजचे दर

GoodNews! सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या, आजचे दर

Subscribe

भारतात आजही सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. एमसीएक्सवरील डिसेंबरमधील सोन्या चांदीचे दर सलग दुसर्‍या दिवशी घसरला आहे. आज तो 0.22 टक्क्यांनी घसरून 50437 रुपये झाला, तर चांदीचा वायदा 0.7 टक्क्यांनी घसरून 61,250 रुपये प्रति किलो झाला.

मागील काही दिवसात सोन्याचा दर 0.3 टक्क्यांनी घसरला होता, तर चांदीमध्ये 0.2 टक्क्यांनी वाढ झाली होती. जागतिक बाजारपेठेत आज सोन्याचा दर स्थिर होता. तो 1,900 डॉलर प्रति औंस होता. तर चांदी 0.1 टक्क्यांनी वाढून 24.20 डॉलर प्रति औंस झाली होती. सर्वसाधारणपणे आज सुरक्षित मालमत्ता म्हणून गणले जाणारे अमेरिकी डॉलर सहा मोठ्या चलनांच्या तुलनेत 93.735 वर होते.

- Advertisement -

जागतिक स्तराच्या अनुषंगाने भारतात यावर्षी सोन्याच्या किंमती 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अमेरिकन डॉलरच्या आधारे आणि बाजारपेठेतील सर्वसाधारण जोखमीवर आधारित सोन्याच्या किंमतीत घट होण्याची विश्लेषकांची अपेक्षा आहे. उत्सवाच्या हंगामात भारतात सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांनी सांगितले आहे.

शुक्रवारी जगातील सर्वात मोठा सोनं एक्सचेंज-ट्रेड फंड असलेल्या एसपीडीआर गोल्ड ट्रस्टची होल्डिंग शुक्रवारी 0.27 टक्क्यांनी घसरून 1,272.56 टन झाली. जागतिक गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार भारताकडे सध्या 653 मेट्रिक टन सोने आहे. यासह, सर्वाधिक सोन्याच्या राखीच्या बाबतीत भारत जगात 9 व्या स्थानावर आहे.


Galaxy S30 Leak: अशी असणार सॅमसंगची पुढील flagship; जानेवारीत होणार लाँच!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -