घरदेश-विदेशपूजाअर्जा करून सोनियांनी दाखल केला रायबरेलीतून अर्ज

पूजाअर्जा करून सोनियांनी दाखल केला रायबरेलीतून अर्ज

Subscribe

कॉग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज दुपारी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे सुपुत्र आणि कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्यासोबत होते. अर्ज दाखल करतेवेळी कॉँग्रेसतर्फे या ठिकाणी मोठा रोड शो आयोजित करण्यात आला होता. अर्ज दाखल करण्यापूर्वी सोनिया गांधी यांनी मुलगी प्रियांका गांधी आणि पुत्र राहुल गांधी यांच्यासह पूजेमध्ये भाग घेतला.

- Advertisement -

उत्तरप्रदेशमधील रायबरेली हा कॉँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. याठिकाणाहून आज सोनिया गांधी यांनी चौथ्यांना उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 2004 पासून त्या येथील मतदारसंघातून लोकसभेमध्ये प्रतिनिधीत्व करत आल्या आहेत. यंदा त्यांचा सामना कॉँग्रेसमधून भाजपात गेलेले दिनेश सिंह यांच्यासोबत असणार आहे. या ठिकाणी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यांत 6 मे रोजी मतदान होणार आहे.

- Advertisement -

हा मतदारसंघ यापूर्वी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा होता. 1967 सालापासून या ठिकाणी अर्ज दाखल करण्यापूर्वी होम हवन करूनच गांधी परिवार जिल्हधिकारी कार्यालयात जात असल्याची परंपरा आहे. आजही सोनिया गांधी यांनी होम हवन व पूजापाठ करूनच अर्ज दाखल केला. कालच अमेठीमधून त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -