घरदेश-विदेशदक्षिण पूर्व आशियामध्ये सर्वात छोट्या 'चेरी'चा जन्म

दक्षिण पूर्व आशियामध्ये सर्वात छोट्या ‘चेरी’चा जन्म

Subscribe

त्तीसगडमधील निकिती आणि सौरभ या दाम्पत्याला झालेल्या या मुलीचं नाव चेरी ठेवण्यात आलं असून डिलिव्हरीच्या आधी ४ महिने तिचा जन्म झाला आहे. या मुलीचं वजन जन्माच्या वेळी केवळ ३७५ ग्रॅम होतं.

हैदराबादच्या रेनबो हॉस्पिटलमध्ये दक्षिण आशियामधील सर्वात छोट्या मुलीचा जन्म झाला असून मुलीची तब्बेत व्यवस्थित आहे. छत्तीसगडमधील निकिती आणि सौरभ या दाम्पत्याला झालेल्या या मुलीचं नाव चेरी ठेवण्यात आलं असून डिलिव्हरीच्या आधी ४ महिने तिचा जन्म झाला आहे. या मुलीचं वजन जन्माच्या वेळी केवळ ३७५ ग्रॅम होतं. रेनबो हॉस्पिटलमध्ये डायरेक्टर दिनेश कुमार चिरला यांच्या देखरेखीखाली इन्टेसिव्ह केअर युनिटमध्ये तिला ठेवण्यात आलं होतं. डिस्जार्चच्या वेळी या मुलीचं वजन १ किलो ९८० ग्रॅम इतकं झालं.

चेरीला जन्मानंतर १२८ दिवसांनी डिस्चार्ज

चेरीची आई निकीताचा वैद्यकीय कारणांमुळं यापूर्वी ४ वेळा गर्भपात करण्यात आला होता. तर चेरीच्या वेळीदेखील २४ व्या आठवड्यात बाळाच वजन केवळ ३५० ग्रॅम असून फ्लूईड कमी असल्यामुळं दगावण्याची शक्यता निर्माण झाली होती. तर आईकडून बाळाला रक्ताचाही नीट पुरवठा होत नव्हता. मात्र रेनबो हॉस्पिटलच्या महिला डॉक्टर्स आणि नवजात बाळाच्या तज्ज्ञांनी व्यवस्थित योजना आखून २७ फेब्रुवारीला चेरीचा जन्म व्यवस्थित केला. जन्माच्या वेळी चेरी केवळ २० सेंटीमीटर लांब होती. केवळ हाताच्या तळव्याइतकी तिची उंची होती. त्यामुळं ती दक्षिण आशियातील सर्वात लहान बाळ ठरली आहे. १२८ दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिला ठेवल्यानंतर १९ जुलैला तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

चेरीच्या आईनं मानले आभार

रेनबो हॉस्पिटलमध्ये येण्याआधी चेरीची आई निकीता आणि वडील सौरभ यांनी सर्व आशा सोडून दिल्या होत्या. पण सर्व डॉक्टरांनी केलेली मदत आणि चेरीच्या जन्मानंतर आता निकिता प्रचंड आनंदी असल्याचं सांगितलं आहे. याचं सर्व श्रेय तिनं डॉक्टरांना दिलं आहे. २४ तास सतत डॉक्टरांनी लक्ष दिल्यामुळंच हे शक्य झाल्याचं तिनं म्हटलं. तर चेरी हे नावदेखील डॉक्टरांच्या सल्ल्यानंच ठेवल्याचंही तिनं नमूद केलं आहे. तर वडील सौरभ यांनी तिला सतत आधार दिल्याचंही तिनं सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -