घरदेश-विदेशप. बंगालमध्ये एल्फिस्टनसारखी दुर्घटना; पादचारी पुलावर चेंगराचेंगरी

प. बंगालमध्ये एल्फिस्टनसारखी दुर्घटना; पादचारी पुलावर चेंगराचेंगरी

Subscribe

पश्चिम बंगालमध्ये मुंबईतल्या एल्फिस्टनसारखी पुनरावृत्ती झाली आहे. हावडामधील संतरागाछी रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाली असून यामध्ये एकाचा मृत्यू तर १४ जण जखमी झाले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये मुंबईतल्या एल्फिस्टनसारखी पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली आहे. रेल्व स्थानकावरील पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाली आहे. हावडामधील संतरागाछी रेल्वे स्थानकावर ही घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे तर १४ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांना हावडा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन रेल्वे एकत्र आल्यामुळे पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

जखमींवर उपचार सुरु

पश्चिम बंगालच्या हावडा येथील संतरागाछी रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलावर संध्याकाळी ६.३० वाजता ही घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर १४ जण जखमी झाले आहे. जखमींमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा देखील समावेश आहे. प्रवाशांच्या मोठ्या गर्दीमुळे ही चेंगराचेंगरी झाली. जेव्हा एकाचवेळी दोन ट्रेन प्लॅटफॉर्मला आल्या तेव्हा पादचारीपुलावर मोठी गर्दी होऊन चेंगराचेगंरी झाली. जखमींना नजीकच्या हावडा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एकाचवेळी दोन ट्रेन आल्या

नागरकोईल-शालीमार एक्सप्रेस आणि दो ईएमयू ट्रेन एकाच वेळी संतरागाछी रेल्वे स्टेशवर आल्या. त्याचवेळी शालीमार-विशाखापट्टनम एक्सप्रेस आणि संतरागाछी-चेन्नई एक्सप्रेस लवकरच रेल्वे स्थानकावर पोहचणार होत्या. एकाचवेळी दोन्ही ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे तर दुसऱ्या दोन ट्रेन प्लॅटफॉर्मवर येणार होत्या. त्यामुळे आलेल्या ट्रेनमधून उतरलेले प्रवासी आणि दुसऱ्या ट्रेन पकडण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची एकच गर्दी पादचारी पुलावर झाली आणि चेंगराचेंगरी झाली.

- Advertisement -

हेल्पलाईन नंबर जारी

दुर्घटनेनंतर पश्चिम बंगाल रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. संतरागाछी – ०३३२६२९५५६१, खडगपूर – ०३३२६२९५५६१. रेल्वे प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतरागाछी रेल्वे स्टेशनवर दाखल झाल्या आहेत.

याप्रकरणाची चौकशी केली जाईल

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वे प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मी रेल्वे मंत्री राहिली आहे. मला काम करण्याची पध्दत माहिती आहे. रेल्वेकडून बेजबाबदारपणा झाला आहे. का अशाप्रकारच्या घटना नियमितपणे घडत आहेत. याप्रकरणाची प्रशासकिय चौकशी केली जाईल.

मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

या दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबियांना आणि जखमींना पश्चिम बंगाल सरकारने मदत जाहीर केली आहे. मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत तर जखमींना १ लाखांची मदत देण्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे. जर माझा पुल पडतो तेव्हा ती माझी जबाबदारी आहे. जर रेल्वेचा पुल पडतो तेव्हा ती रेल्वेची जबाबदारी आहे. सुरक्षेशी तडजोड केली जाऊ शकत नहाी. रेल्वे देशाची जीवनरेखा आहे. काही दिवसापूर्वीच अमृतसरमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली होती त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -