घरदेश-विदेशवाजपेयींचं लक्ष हटवण्यासाठी घेतली माधुरीची मदत

वाजपेयींचं लक्ष हटवण्यासाठी घेतली माधुरीची मदत

Subscribe

अटलजींच्या खाण्याच्या आवडीबद्दल काही जवळचे मित्र आणि पत्रकारांनीही आठवणी जागवल्या आहेत. त्यापैकीच हा एक किस्सा आहे. माधुरी दीक्षितची मदत त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांना घ्यावी लागली होती.

अटलबिहारी वाजपेयींना खाण्याची खूप हौस होती. त्यांना गोड पदार्थ खूपच आवडत असतं. एकवेळ तर अशी आली होती की, गुलाबजामवरून त्यांचं लक्ष हटवण्यासाठी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांना अभिनेत्री माधुरी दीक्षितची मदत घ्यावी लागली होती. वाजपेयींचं गुरुवारी संध्याकाळी निधन झालं. मात्र त्यांच्या जवळचे लोक आता त्यांच्या आठवणी जागवत आहेत. त्यांच्या खाण्याच्या आवडीबद्दल काही जवळचे मित्र आणि पत्रकारांनीही आठवणी जागवल्या आहेत. त्यापैकीच हा एक किस्सा आहे. खाण्यामध्ये त्यांना मिठाई आणि सी – फूडमध्ये झिंगा प्रचंड आवडायचं.

काय आहे नक्की हा किस्सा?

वाजपेयींबद्दल माहिती असणाऱ्या एका वरीष्ठ पत्रकारानं हा किस्सा सांगितला आहे. बऱ्याचदा त्यांच्याबरोबर पत्रकारांना जेवायची संधी मिळाली होती. वरीष्ठ पत्रकार राशीद किडवईंनी यावर हा किस्सा सांगितला आहे. वाजपेयी पंतप्रधान असताना एका कार्यक्रमात त्यांचं लक्ष गुलाबजामकडे गेलं. काऊंटरवर असलेले गुलाबजाम खाण्यासाठी वाजपेयी वळणार होते. पण त्यांना थांबवायचं कसं हे त्यांच्या सहकाऱ्यांना कळत नव्हतं. त्याच वेळी त्यांनी अत्रिनेत्री माधुरी दीक्षित यांची भेट वाजपेयींशी घालून दिली. वाजपेयींना खाण्याप्रमाणेच चित्रपटांचीही आवड होती. त्यामुळं खाण्यावरून त्यांचं लक्ष विचलित होऊन माधुरीशी चित्रपटांविषयी गप्पा मारण्यात मशगुल झाले. त्याचवेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी तिथे असलेल्या सगळ्या मिठाई तिथून गायब केल्या. इतकंच नाही तर, ‘मिठाई किंवा मांसाहार यापैकी एक तरी पदार्थ ते स्वतः आमच्यासाठी बनवायचे,’ अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

- Advertisement -

पक्वान्नाचा आस्वाद न चुकता

वाजपेयींबरोबर काम करणाऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं की, वाजपेयी जिथेही जायचे तिथल्या पक्वान्नाचा आस्वाद न चुकता घ्यायचे. त्यांना कोलकातामधील पुचका, हैदराबादमधील बिर्याणी आणि हलीम आणि लखनऊमधील गलावटी कबाब हे त्यांचे आवडते पदार्थ होते. वास्तविक चाट मसाल्यासह गरम भजी आणि मसाला चहा हा त्यांचा सर्वात आवडता नाश्ता होता. प्रत्येक पदार्थ ते अगदी चवीनं खायचे असं त्यांच्या जवळच्या व्यक्ती सांगतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान वाजपेयी खारट भुईमूगाच्या शेंगा खात राहायचे आणि प्लेटमधून संपल्या की, त्या शेंगा लगेच भरल्या गेल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं असायचं, एका जवळच्या मित्रानं असंही सांगितलं आहे. तर लालजी टंडन हे लखनऊमधील चौकातून त्यांच्यासाठी कबाब घेऊन येत असत आणि ते प्रेमानं खात असत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -