घरदेश-विदेशज्येष्ठ गायिका सुमित्रा सेन काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ गायिका सुमित्रा सेन काळाच्या पडद्याआड

Subscribe

Sumitra Sen | सुमित्रा सेन यांच्या निधनामुळे संगीत विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. अनेक गायकांनी आणि चाहत्यांना त्यांना आदरांजली वाहिली.

कोलकाता – ऑ रविंद्र संगीत गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या सुमित्रा सेन यांचं आज निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाच्या विकाराने त्या गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होत्या.

सुमित्रा सेन यांना २१ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ब्रोको निमोनिया झाला होता. दरम्यान, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अखेर, कोलकातामधील घरात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. अनेक गायकांनी आणि चाहत्यांना त्यांना आदरांजली वाहिली.

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सुमित्रा सेन यांना आदरांजली वाहिली. त्या म्हणाल्या की, सुमित्रा सेन यांच्या जाण्याचे वृत्त कळताच मला खूप मोठा धक्का बसला आहे. त्यांनी कित्येक दशके आपल्या गायकीने चाहत्यांना सुरानंद दिला. त्या नेहमीच त्यांच्या आवाजाच्या रुपाने आपल्यात राहतील. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहानुभूती व्यक्त करते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -