घरदेश-विदेशविधानसभा निवडणुकीदरम्यान Electoral Bond ची विक्री सुरू राहणार - SC

विधानसभा निवडणुकीदरम्यान Electoral Bond ची विक्री सुरू राहणार – SC

Subscribe

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरीच्या केंद्रशासित प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक रोख्यांच्या (Electoral Bond) विक्रीवर बंदी घालण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. देशात निवडणुकीदरम्यान निवडणूक रोख्यांच्या विक्री करू नये, अशी सर्वोच्च न्यायालयात गेल्या काही दिवसांपूर्वी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या एमजीओने ही याचिका दाखल केली होती. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यास नकार दिला आणि १ एप्रिलपासून नवीन निवडणूक रोख्यांच्या विक्रीस परवानगी दिली आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निकाल राखून २६ मार्च रोजी निकालाची तारीख निश्चित केली. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने निवडणूक रोख्यांची पुढील विक्री करण्यास मनाई नाकारली आहे.

- Advertisement -

 

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या काळातही Electoral Bond ची विक्री करणे म्हणजे राजकीय पक्षांना अवैध मार्गाने पैसे जमा करण्यास प्रोत्साहन देण्यासारखं आहे, असं या याचिकेत म्हटले होते. या याचिकेवर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स च्या तर्फे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी बाजू मांडली होती. यासह १ एप्रिल रोजी Electoral Bond च्या नव्या सेटची विक्री करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

दरम्यान, Electoral Bond म्हणजेच निवडणूक रोखे सुरुवातीपासूनच वादात सापडले असून त्यांचा गैरवापर करण्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. यापूर्वी बुधवारी न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता आणि केंद्र सरकारला निवडणूक रोख्यांच्या दुरुपयोगाबद्दल प्रश्न उपस्थितीत केला होता. तसेच, सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप केला गेला होता की देणगीच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाला लाच देण्याचा खेळ सुरू आहे, तो थांबला पाहिजे. दरम्यान, निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून ठराविक पक्षाला नव्हे तर सर्व पक्षांना देणगी मिळते, असे देखील म्हटलं आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -