घरदेश-विदेशतबलिगींच्या कार्यक्रमामुळे कोरोनाचा फैलाव; सरकारने दिली माहिती

तबलिगींच्या कार्यक्रमामुळे कोरोनाचा फैलाव; सरकारने दिली माहिती

Subscribe

देशातील कोरोना विषाणूच्या प्रारंभीच्या टप्प्यात दिल्लीतील निझामुद्दीन भागात मार्च महिन्यात तबलिगी जमातने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात देशासह विदेशातून मोठ्या संख्येने लोक एकत्र आले होते. त्यामुळे देशात अनेकांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी राज्यसभेत सांगितलं. केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी राज्यसभेत लेखी उत्तर देताना सांगितलं.

केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी राज्यसभेत सांगितलं की, दिल्ली पोलिसांनी २३३ तबलिगी जमातच्या सदस्यांना अटक केली आणि २९ मार्चपर्यंत २,३६१ लोकांना संघटनेच्या मुख्यालयातून बाहेर काढण्यात आलं. तर तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना मोहम्मद साद यांची सध्या चौकशी सुरु आहे.”

- Advertisement -

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार “कोरोनाच्या उद्रेकाच्या अनुषंगाने विविध प्राधिकरणांनी मार्गदर्शक सूचना तसंच आदेश जारी केलेले असतानाही दीर्घ कालावधीसाठी फिजिकल डिस्टंसिंग न पाळता मास्क आणि सॅनिटायझरची तरतुद न करता बंद जागेत एक मोठा मेळावा आयोजित करण्यात आला होता.” त्यामुळे अनेकांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे, असं केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितलं.

दरम्यान, या आधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तबलिगी जमातच्या लोकांमुळे कोरोना पसरला नसून त्यांना बळीचा बकरा बनवण्यात आलं आहे, असं सांगितलं होतं. यावेळी त्यांनी तबलिगी जमातच्या लोकांवरील एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले होते. “मरकज सारखे कार्यक्रम गेल्या ५० वर्षांपासून सुरु आहेत. या कार्यक्रमाविरोधात जो प्रचार करण्यात आला तो चुकीचा आहे. देशात वेगाने पसरत असलेल्या कोरोना संक्रमणाच्या आकड्यांवर नजर टाकली तर या लोकांविरोधात केलेली कारवाई अयोग्य वाटते. हे नुकसान भरून काढण्यासाठी आता सकारात्मक पावले उचलावीत”, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -