घरCORONA UPDATEमालिकेच्या सेटवर ज्येष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर यांना कोरोनाची लागण!

मालिकेच्या सेटवर ज्येष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर यांना कोरोनाची लागण!

Subscribe

काळूबाईच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या  सेटवर २७ जणांना कोरोनाची लागण

काळूबाईच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या  सेटवर २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना तातडीने इस्पितळात भरती करण्यात आलं आहे. मालिकेच्या सेटवर त्यांना कोनाची लागण झाली.

विशेष म्हणजे मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईवरून एक डान्स ग्रुप बोलावण्यात आला होता. यांच्यामार्फत कोरोनाची लागण झाल्याचं सध्या म्हटलं जात आहे. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली. यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याने साताऱ्यातील चित्रीकरण थांबवलं आहे.

- Advertisement -

या सिंगीग स्टार या कार्यक्रमातील ७ ते ८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी देखील या कार्यक्रमाचे शुटींग थांबवण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा कार्यक्रमाचे शुटींग सुरू करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -