घरदेश-विदेशTamil Nadu Election 2021: कमल हासन यांचा जाहीरनामा प्रसिद्ध; म्हणाले, माझा पक्ष...

Tamil Nadu Election 2021: कमल हासन यांचा जाहीरनामा प्रसिद्ध; म्हणाले, माझा पक्ष सत्तेत आलं तर…

Subscribe

तमिळनाडू निवडणुकांपूर्वी मक्कल निधी मय्यम यांचे प्रमुख कमल हासन यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तब्बल १०८ पानांच्या जाहीरनाम्यात त्यांनी राज्यातील जनतेच्या हितासाठी एकामागून एक मोठी आश्वासनं दिली आहेत. कमल हासन यांनी कोयंबटूर येथून आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. कमल हासन यांनी आपल्या जाहीरनाम्यात असे आश्वासन दिले आहे की, जर त्यांचा पक्ष सत्तेत आला तर हे कृषी विधेयक २०२० राज्यात लागू होणार नाही. तसेच प्रामाणिक कर्मचार्‍यांना त्यांच्या कर्तव्यात २ ते ५ वर्षे मुदतवाढ देण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

घोषणापत्र जारी करताना कमल हासन म्हणाले, मक्कल निधी माय्यम पक्षाचे सरकार आल्यास राज्यातील भूजल पातळी वाढविण्याचेही काम केले जाईल. सरकार यासाठी ब्लू क्रांती देखील आणेल आणि भूजल संवर्धनास चालना देण्यास प्राधान्य देण्यात येईल. भूजल संवर्धनाबाबत कमल हासन यांनी आपल्या जाहीरनाम्यात असेही म्हटले की, यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात येईल आणि विशेष अर्थसंकल्प देण्यात येईल. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले की सेंद्रिय शेतीसाठी हरितक्रांती आणली जाईल जेणेकरून सेंद्रिय शेतीला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळू शकेल.

कमल हासन यांनी आपल्या जाहीरनाम्यातून महिला मतदारांनाही भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला. या जाहीरनाम्याच्या माध्यमातून कमल हासन यांनी महिलांविषयी अनेक आश्वासनेही दिली आहेत. ज्यामध्ये महिलांचे कौशल्य सुधारण्यासह त्याद्वारे उत्पन्न वाढविणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. कमल हासन यांनी म्हटले की, सर्व बीपीएलधारकांना ई-गव्हर्नन्स सेवा अंतर्गत संगणक दिले जातील. तसेच गृहिणींना दरमहा ३ हजार रुपये देण्यात येतील. शासकीय शाळांसाठी विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येतील. तर राज्यात गरीब लोकांसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारले जातील आणि त्यातून बनविलेली वीज या लोकांना विनाशुल्क दिली देण्यात येणार असल्याचंही आश्वासन दिले आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -