घरदेश-विदेशअखेर 'तिचा' पासपोर्ट रद्द, अधिकाऱ्याशी हुज्जत पडली महागात

अखेर ‘तिचा’ पासपोर्ट रद्द, अधिकाऱ्याशी हुज्जत पडली महागात

Subscribe

पासपोर्ट मिळवण्यासाठी तन्वीने लखनऊमध्ये अर्ज दाखल केला होता. त्यासाठी तिने लखनऊमध्ये वास्तव्यात असल्याची कागदपत्रे जमा केली होती. पण त्या पत्त्यावर चौकशी केल्यानंतर तन्वी त्या पत्त्यावर राहत नसल्याचे समोर आले.

मुस्लिम मुलाशी विवाह केला म्हणून पासपोर्ट नाकारला, असा कांगावा करणाऱ्या तन्वी सेठ आणि अनास सिद्दिकीचा खरा चेहरा आता समोर आला आहे. पासपोर्ट मिळवण्यासाठी खोटी माहिती दिल्याचे समोर आल्यानंतर आता तिचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. शिवाय तिला ५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे पासपोर्ट अधिकारी विकास मिश्रा यांच्यावरील तन्वी आणि अनासचे आरोप आता साफ खोटे ठरले आहेत.

तन्वीने सादर केलेली कागदपत्रे खोटीच

पासपोर्ट मिळवण्यासाठी तन्वीने लखनऊमध्ये अर्ज दाखल केला होता. त्यासाठी तिने लखनऊमध्ये वास्तव्यात असल्याची कागदपत्रे जमा केली होती. पण त्या पत्त्यावर चौकशी केल्यानंतर तन्वी त्या पत्त्यावर राहत नसल्याचे समोर आले. कैसरबाग येथे येथील तन्सावीच्या सासरी चौकशी केल्यानंतर ते लखनऊला राहत असल्याचे कोणतेही कागदी पुरावेदेखील पोलिसांना सापडले नाहीत. त्यामुळे तन्वीवरील संशय अधिकच बळावला.

- Advertisement -

अधिक वाचा‘धर्म बदला आणि पासपोर्ट घ्या’, दिल्लीत जोडप्याची कुचंबणा!

तन्वी नोएडाचीच!

मुळात पासपोर्टच्या चौकशीसाठी पत्ता देताना त्या पत्त्यावर किमान १ वर्षाचे वास्तव्य असणे गरजेचे आहे. कागदपत्रांसोबत तिचे गेल्या १ वर्षाचे फोन लोकेशन तपासण्यात आले. त्यावरुनही तन्वी दिल्लीतल्या नोएडा भागात राहात असल्याचाच पुरावा मिळाला आहे. त्यामुळे लखनऊला राहात असल्याची कागदपत्रे खोटी असल्याचे उघड झाले आहे.

- Advertisement -

नेमकं खटकलं कधी?

१.दिल्लीतल्या नोएडा भागात राहणाऱ्या तन्वीने दिल्लीतील पासपोर्ट ऑफिस सोडून लखनऊ पासपोर्ट ऑफिसमध्ये पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला
२. निकाहनामा पुरावा म्हणून सादर केल्यानंतर अन्य कागदपत्रांवरील नाव बदलण्यास तिने नकार दिला
३. तन्वीसोबत तिचा नवरा अनास सिद्दकी पासपोर्ट नुतनीकरणासाठी आला होता. पासपोर्ट अधिकाऱ्यावर त्याने धर्म बदलाचा आरोप लावला होता. पण असे काही झाले नसल्याचा एक प्रत्यक्षदर्शीचा व्हिडिओ समोर आला
४. पासपोर्ट का मिळाला नाही? असा प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हिंदू-मुस्लिम धर्माला हाताशी धरले.

अधिक वाचाआता पासपोर्ट प्रकरणाला वेगळेच वळण..

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -