घरमनोरंजनगश्मीर महाजनीचं 'टेलिव्हीजन'वर पदार्पण...

गश्मीर महाजनीचं ‘टेलिव्हीजन’वर पदार्पण…

Subscribe

आपल्या हँडसम लूक्सच्या जोरावर मराठी प्रेक्षकांना भुरळ घालणारा 'गश्मीर महाजनी', आता लवकरच टेलिव्हीजनवर येतो आहे.

मराठी सिनेसृष्टीतला हँड्सम अभिनेता अशी गश्मीर महाजनीची ओळख आहे. गश्मीरने अभिनयासोबतच आपल्या लूक्सच्या जोरावर अनेकांना भुरळ घातली आहे. गश्मीर हा ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मुलगा आहे. आजवर अनेक सिनेमांमधून मोठ्या स्क्रिनवर झळकलेला गश्मीर लवकरच छोट्या पडद्यावर अर्थात टेलिव्हिजनवर पदार्पण करतो आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर गश्मीरचा एक नवा-कोरा शो लवकरच येतो आहे. मराठी सिनेसृष्टीत सध्या या शोची जोरदार चर्चा आहे.

गश्मीरचं ‘पदार्पण’ असणार खास?

या शोच्या निमित्ताने गश्मीर महाजनी प्रथमच टेलिव्हिजनवर झळकणार आहे. त्यामुळे गश्मीरला एका नव्या रुपात पाहायला त्याचे चाहते नक्कीच उत्सुक असणार. मात्र, दुसरीकडे ‘मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात याआधी अशा पद्धतीने कोणत्याच कलाकाराचं पदार्पण झालेलं नाही’, असा दावा स्टार प्रवाह चॅनलने केल्याचं समजतंय. यामुळे गश्मीरचा हा शो नक्कीच काहीतरी खास असणार असं दिसतयं. गश्मीरचा टेलिव्हिजनवरचा हा आगळावेगळा आणि पहिलाच प्रयोग नेमका कसा असेल? याबद्दलची उत्सुकता आता ताणली गेली आहे.

- Advertisement -

सिनेमातून झळकलेला ‘हॅंड्सम हंक’

गश्मीरने आजवर अनेक मराठी सिनेमांमधून चाहत्यांवर आपल्या अभिनयाची आणि स्मार्ट लूक्सची छाप पाडली कॅरी ऑन मराठा सिनेमातून गश्मीरने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर देऊळ बंद, कान्हा, वन वे तिकीट आणि मला काही प्रॉब्लेम नाही आदी सिनेमांमधून गश्मीरने काम केले आहे. गश्मीर अभिनेता म्हणून जितका चांगला आहे, तितकाच तो माणूस म्हणूनही चांगला असल्याचे त्याचे सहकलाकार सांगतात. मराठी सिनेमांमध्ये आपली स्वतंत्र्य ओळख निर्माण करणाऱ्या गश्मीरने सिनेसृष्टीत खऱ्या अर्थाने पदार्पण केले ते एका हिंदी सिनेमातून. २०१० साली आलेल्या मुस्कुराके देख जरा या हिंदी सिनेमातून त्याने या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. आता छोट्या पडद्यावर गश्मीर काय कमाल दाखवतो याचा लवकरच उलगडा होईल.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -