घरमनोरंजन'सिम्बा' रणवीरचं सर्वात मोठं गाणं

‘सिम्बा’ रणवीरचं सर्वात मोठं गाणं

Subscribe

पहिल्यांदाच रोहित आणि करण जोहर एकत्र येऊन 'सिम्बा' चित्रपट बनवत असून रणवीर सिंगबरोबर रोहित काम करत आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण चालू असून रणवीरनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून 'सबसे बडा गाना' असा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

रणवीर सिंग आणि सारा अलीचा ‘सिम्बा’ चित्रपटाची सर्वच प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहात आहेत. अॅक्शन, नाट्य, कॉमेडी अशा परफेक्ट मसाल्यानं भरलेला चित्रपट ही रोहित शेट्टीच्या चित्रपटांची खासियत आहे. पहिल्यांदाच रोहित आणि करण जोहर एकत्र येऊन ‘सिम्बा’ चित्रपट बनवत असून रणवीर सिंगबरोबर रोहित काम करत आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण चालू असून रणवीरनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘सबसे बडा गाना’ असा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पुन्हा रणवीर आणि गणेश आचार्य

रणवीरनं आपल्या गाण्याच्या चित्रीकरणाचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टावरून पोस्ट केला आहे. ज्यामध्ये बऱ्याच संख्येने डान्सर दिसत असून रणवीरनं या व्हिडिओला ‘सबसे बडा गाना’ अशी कॅप्शन दिली आहे. ‘आला रे आला सिम्बा आला’ असे या गाण्याचे बोल असून हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये या गाण्याचं चित्रीकरण सुरू आहे. गाण्याबद्दल रणवीर आपल्या व्हिडिओमध्ये माहिती देत आहे. तर रणवीर माहिती देत असतानाच रोहित शेट्टीदेखील त्यात येत आहे. सर्वात शेवटी गाण्याचा नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. गणेश आचार्यने यापूर्वी रणवीरसाठी बऱ्याच गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन केलं असून ती सगळी गाणी गाजली आहेत. त्यामुळं हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर यावेळीदेखील या जोडीची जादू चालणार का? हे पाहणं रंजक ठरेल.

SABSE BADA GAANA!!! ????????? @itsrohitshetty @ganeshacharyaa #Simmba ??‍♂️

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

- Advertisement -

रोहित आणि रणवीरची मॅडपंती

रोहित आणि रणवीरची मॅडपंती एकाच चित्रपटात दिसणार असून प्रेक्षकही या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. रोहित आणि रणवीर हे दोघेही आपल्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहेत. दोघेही पहिल्यांदाच ‘सिम्बा’च्या निमित्तानं एकत्र काम करत असून त्यांची ही मॅडपंती चित्रपटातदेखील बघायला मिळणार का? याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -