घरदेश-विदेशबोर्डाची परिक्षा टाळण्यासाठी ३ वर्षाच्या भावाचे केले अपहरण

बोर्डाची परिक्षा टाळण्यासाठी ३ वर्षाच्या भावाचे केले अपहरण

Subscribe

१२ वीची परिक्षा देता न यावी यासाठी एका युवकाने चक्क ३ वर्षाच्या बाळाचे अपहरण केले आहे. 

बोर्डाच्या परिक्षेच्या काळात वेगवेगळे प्रकार दरवर्षीच घडत असतात. बऱ्याचदा परिक्षेची योग्य तयारी न झाल्याने विद्यार्थी वेगवेगळी पावले उचलत असतात. अनेक विद्यार्थ्यांची अभ्यासाची क्षमता कमी असते त्यामुळे विद्यार्थी अनेकदा चुकीच्या मार्गाकडे वळतात. असाच एक प्रकार मध्य प्रदेशमध्ये पाहायला मिळाला आहे. १२ वीची परिक्षा देता न यावी यासाठी एका युवकाने चक्क आपल्या ३ वर्षाच्या भावाचेच अपहरण केले आहे.

मध्य प्रदेशच्या मुरेना जिल्ह्यातील तुदीला गावातल्या १८ वर्षीय रनबीर ने १२ वीच्या परिक्षेपासून टाळण्यासाठी त्याच्या ३ वर्षाच्या चूलत भावाचे अपहरण करून शेतात फेकले. दुपारच्या सुमारास बाळ झोपले असताना त्याला दोरीने बांधून शेतात फेकले. बराच वेळ बाळ न दिसल्याने त्याच्या आईने पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिस त्यांच्या घरी दाखल झाले तपासादरम्यान पोलिसांना एक कागद सापडला. त्यामध्ये त्याला परिक्षा द्यायचे नसल्याचे वृत्त आढळले. त्यावरून पोलिसांनी रनबीरला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. चौकशी दरम्यान रनबीरने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि ३ वर्षाच्या बाळाला जिथे फेकले होते त्याठिकाणी पोलिसांना नेले. त्यानंतर पोलिसांनी बाळाला सुखरूप बाहेर काढून आईकडे सूपूर्त केले. आरोपी रनबीरवर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

मुलांना परीक्षार्थी न बनवता ज्ञानार्थी बनवायचे आहे हे सध्या सर्वजण जणू विसरूनच गेले आहेत. विद्यार्थांवर पालकदेखील एवढे मार्क मिळाले पाहिजे तेवढे मार्क मिळाले पाहिजेत असे सांगत असतात. अनेक विद्यार्थी याचा ताण घेत चूकीचे पाऊल उचलतात. याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. हे वेळीच थांबवून योग्य ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे.


हेही वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया सोडणार नाहीत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -