घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरमध्ये RSS नेत्यावर दहशतवादी हल्ला; बॉडीगार्डचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये RSS नेत्यावर दहशतवादी हल्ला; बॉडीगार्डचा मृत्यू

Subscribe

बुरखा घालून आलेल्या दहशतवाद्यांनी आरएएसच्या नेत्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात आरएसएस नेता जखमी झाले असून त्यांच्या बॉडीगार्डचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका रुग्णालयावर हल्ला केला आहे. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमधील एका रुग्णालयावर हा हल्ला करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वंय सेवक संघांचे नेते चंद्रकांत शर्मा यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते जखमी झाले मात्र त्यांच्या बॉडीगार्डचा यामध्ये दुर्देवी मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. या हल्ल्यानंतर रुग्णालयासह आसपासच्या परिसरामध्ये मोठा सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, बुरखा घालून दहशतवादी आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

अशी घडली घटना

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत किश्तवाडा येथील एका रुग्णालयात उपचार करत होते. त्याचवेळी ओपीडीमध्ये दहशतवादी बुरखा घालून घुसले. त्यांनी चंद्रकांत शर्मा यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात सुदैवाने चंद्रकांत शर्मा वाचले. ते जखमी झाले आहेत. मात्र त्यांचा बॉडीगार्डचा मृत्यू झाला. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर हॉस्पिटलमध्ये भितीचे वातावरण होते. रुग्णालयात उपस्थित असलेले सर्व रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक इकडे तिकडे पळू लागले. याचाच फायदा घेत दहशतवादी पळून गेले.

आरएसएस नेत्याच्या बॉडीगार्डचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच लष्कराच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णालयाला घेराव घातले. त्यानंतर सर्च ऑपरेश सुरु केले. हल्लेखोरांच्या शोधासाठी रुग्णालयातील प्रत्यदर्शिंची देखील विचारपूस करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार. संशयित दहशतवादी रुग्णालयात पोहचले त्यांनी आरएसएस नेता चंद्रकांत यांच्या बॉडीगार्डच्या हातातील बंदूक हिस्कावले. त्यानंतर त्यांनी चंद्रकांत यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात चद्रकांता वाचले मात्र त्यांच्या बॉडीगार्डचा दुर्देवी मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -