घरमहाराष्ट्रटिटवाळ्यामध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

टिटवाळ्यामध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

Subscribe

टिटवाळ्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाला आहे. डॉ. फारुक हुसैन असं या बोगस डॉक्टराचे नाव होते. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी डॉक्टरच्या तीन सहकाऱ्यांना अटक केली आहे.

कंबर आणि गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या नागरीकांसाठी उल्हासनगरमध्ये एका डॉक्टरने शिबीर आयोजित केले होते. परंतु, या शिबिरमध्ये रुग्णांना देण्यात आलेल्या इंजेक्शनमुळे रिअ‍ॅक्शन होवून त्यांच्या कंबरेला गाठी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यात काही जणांनी ऑपरेशन करून गाठीही काढल्या. ते रूग्ण त्या डॉक्टरच्या शोधात असताना टिटवाळा येथे त्याचे शिबिर सुरु होती. रुग्णांनी पोलीस ठाण्यात धाव घेत डॉक्टरच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे या डॉक्टरच्या बोगस गिरीला पर्दाफाश झाला असून टिटवाळा पोलिसांनी डॉक्टरच्या तीन सहकाऱ्यांना अटक केली आहे.

काय नेमकं प्रकरण?

उल्हासनगर – ४ येथील ओटी सेक्शन परिसरात डिसेंबर २०१८ मध्ये डॉ. फारूक हुसैन यांचा कंबर आणि गुडघे दुखीवर उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी संतोषनगर येथे राहणाऱ्या आणि डेकोरेटरचा व्यवसाय करणाऱ्या निलेश बोबडे यांची आई श्रीमती देवी बोबडे (५८) यांनाही गुडघे आणि कंबर दुखीचा त्रास असल्याने ते त्या शिबिराच्या ठिकाणी उपचारासाठी गेल्या. त्याठिकाणी खंडू वारडे यांच्यासह अनेकांनी उपचार करून घेतले होते. त्यावेळी डॉ. फारूक हुसैन यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुडघे आणि कंबर दुखीवर अनेकांना कंबरेवर इंजेक्शन दिले. या इंजेक्शनच्या मोबादल्यात डॉक्टरने त्यांच्याकडून ८०० रूपये फी घेऊन १५ दिवसात आराम पडेल असे सांगितले. पण ७ दिवसातच दिलेल्या इंजेक्शनच्या ठिकाणी श्रीमती देवी बोबडे यांना गाठ आली आणि त्यातून घाण बाहेर येवू लागल्याने मोठया प्रमाणात त्रास होवू लागला. तसाच त्रास खंडू वारडे आणि अनेकांना झाला. श्रीमती बोबडे यांच्यावर कॅम्प नं.५ येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांची गाठ काढण्यात आली. दिलेल्या इंजेक्शनमुळे इंन्फेक्शन झाल्याने ती गाठ आली असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. याशिवाय श्रीमती बोबडे यांना उपचारासाठी ८० हजार रूपये खर्च आला. तेव्हापासून त्यांची प्रकृती बिघडल्याने तसाच त्रास कॅम्पमध्ये उपचार घेतलेल्या अनेकांना होऊ लागल्याने त्यांनी डॉ. फारूक हुसैन यांचा शोध घेण्यास सुरूवात केली.

- Advertisement -

‘असा’ लागला बोगस डॉक्टरचा तपास

डॉ. फारुक हुसैन हे मुळचे राजस्थानचे असून गुडघे आणि कंबर दुखीच्या उपचारासाठी अनेक ठिकाणी शिबिर लावत असल्याची माहिती निलेश बोबडे यांना मिळाली. त्यानंतर बोबडे यांनी डॉ. फारुख हुसैनचा शोध सुरु केला. दरम्यान, डॉ. फारूक हुसैन यांनी टिटवाळा पोलिस स्टेशनच्या हद्दीत जकात नाक्याजवळ औषध देण्याचे शिबिर लावले असल्याची माहिती निलेश बोबडे यांना मिळली. बोबडे खंडू वारडे यांना घेऊन शिबिरच्या ठिकाणी गेले. त्यावेळी डॉ. फारूक हुसैन यांचे ३ सहकारी रूग्णांवर उपचार करीत होते. बोबडे यांनी त्यांना डॉक्टर आहेत का? आणि त्यांच्याकडे डिग्री आहे का? याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी नाही सांगत हा कॅम्प डॉ.फारूक हुसेन यांनी लावला असून ते जयपुरला आहेत, असे सांगितले. त्यावेळी बोबडे यांनी थेट टिटवाळा पोलिस ठाणे गाठून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक खोपकर यांनी त्या ठिकाणी पोलिस पथकासह जावून चौकशी केल्यावर ती बोगस डॉक्टरची टोळी असल्याचा प्रकार त्यांना दिसून आला. कोणतीही वैद्यकिय डिग्री नसताना डॉक्टर असल्याच्या बतावण्या करून पाण्यासारखा दिसणारा द्रव पदार्थाचे इंजेक्शन कंबर आणि गुडघे दुखीने त्रस्त असलेल्या रूग्णांना देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी ८०० रूपये फी घेऊन त्यांची फसवणूक करीत होते. याप्रकरणी निलेश बोबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टिटवाळा पोलिस ठाण्यात राहुल खान, फारूक शहिदा रसिका, मोनु बाल मुकुन आणि डॉ. फारूक हुसैन या चौघांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन तीन जणानां अटक करण्यात आली आहे. पोलिस डॉ. फारूक हुसैन यांचा शोध घेत असुन सहाय्यक पोलीस निरीक्षक खोपकर हे अधिक तपास करीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -