घरताज्या घडामोडीJammu & Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; CRPF चा एक जवान शहीद,...

Jammu & Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; CRPF चा एक जवान शहीद, तर एक जखमी

Subscribe

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफच्या एका जवानासह एक जवान जखमी झाला आहे. श्रीनगरच्या लाल चौक परिसरात दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात नाकाबंदी केली आहे. तसेच दहशतवाद्यांच्या शोधासाठी अनेक पथकं तयार करण्यात आली आहेत.

या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. श्रीनगरमधील नरसुमा नगर म्हणून जो परिसर आहे. त्याठिकाणी दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला आहे. जखमी झालेल्या जवानाला जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार देखील सुरू आहेत.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, या हल्ल्यामागे नेमका कुणाचा हात आहे, याचा तपास सध्या सुरू आहे.

- Advertisement -

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ एका गावात लपून बसलेल्या एका दहशतवाद्याचा पदार्फाश केला आणि शस्त्रांस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. हवेली तहसीलच्या नूरकोट गावात लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान हा ठावठिकाणा सापडला. जप्त केलेल्या दारू गोळ्यामध्ये दोन मॅगझिनसह दोन एके-४७ रायफल आणि ६३ राऊंड, २२३ बोअरची एके आकाराची बंदूक, दोन मॅगझिन आणि २० राऊंड आणि एक चिनी पिस्तूलचा समावेश आहे, असं सांगितलं जातंय.


हेही वाचा : जनतेलाच ईडीची धमकी देणार्‍या भाजपला त्यांची जागा दाखवून द्या – महेश तपासे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -